आनलाईन मतदार नोंदणीत मोठा घोळ : संशयास्पद ऑनलाईन अर्जाची तपासणी करा : काँग्रेस
( तालुका प्रतिनिधी रंगराव कुळसंगे )
आनलाईन मतदार नोंदणीत मोठा घोळ
संशयास्पद ऑनलाईन अर्जाची तपासणी करा : काँग्रेस
राजुरा
राजुरा विधानसभा मतदार संघात नविन मतदार नोंदणी करिता ERO Net ऑनलाइन पोर्टलवर नमूना अर्ज क्र. ६ हजारोंच्या संख्येने नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास येत असून सदर नोंदण्या दिनांक ०१/१०/२०२४ पासून करण्यात आले आहे असे दिसून येते. सदर नोंदण्या हजारोंच्या संख्येने होत असून सद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फायदा घेण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक करण्यात येत आहे असे दिसून येते.
त्यामुळे दिनांक ०१/१०/२०२४ पासून आजपर्यंत सदर ऑनलइन पोर्टल वर नविन मतदार नोंदणी करीता किती नमूना अर्ज क्र. ६ चे अर्ज प्राप्त झालेले आहे. सदर अर्जावर आपल्या मार्फत काय कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदर अर्ज वैद्य आहेत की अवैद्य याबाबत मूल्यमापन झालेले आहे की नाही. हि संपुर्ण विस्तृत माहिती राजुरा-७० विधानसभा मतदार संघातील तालुका निहाय पुरविण्यात यावी. व अवघ्या १५ दिवसांत हजारोंच्या संख्येने ऑनलइन पोर्टलवर नविन मतदार नोंदणी करण्याकरिता अर्ज प्राप्त होणे संशयास्पद असून सदर नोंदणी कुठल्या संगणकाच्या IP Adress वरून अर्ज ऑनलाईन पोर्टलवर टाकण्यात येत आहे याची सखोल चौकशी करून बोगस नोंदणी करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. व ऑनलाइन पोर्टलवर झालेली बोगस मतदार नोंदणी वगळण्यात यावी अशी मागणी राजुरा काँग्रेसच्या वतीने मुख्य निवडणुक आयुक्त भारत निवडणूक आयोग, आयुक्त, महाराष्ट्र निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी विनय गौडा, राजुरा विधानसभा ७० निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अमीरिका राय नावाची व्यक्ती नांदा येथे राहत नाही, असे नाव कधी इथल्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी, नागरिकांनी ऐकलेले नाही. असे असताना असी नावे या गावाच्या मतदार यादीत कशी आलीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशाच पद्धतीने राजुरा – ७० मतदार संघातील मतदार यादीत अनेक नावे घुसवून निवडणूकीत निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे का?, यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारांची अधिक सखोल चौकशी करून सर्व बोगस नावे तातडीने कमी करावी अन्यथा याविरोधात तिव आंदोलन छेडण्याचा इशारा राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.