सौदी अरेबियात फिरायला जाणे महागात पडले…! *चोरट्यांनी घरातील ५ लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला
सौदी अरेबियात फिरायला जाणे महागात पडले…!
*चोरट्यांनी घरातील ५ लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला ———————–++++++++
या बातमी सह आणखी crime च्या बातम्या वाचा 👇
*अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला अटक
*कुटुंब गेले मुंबईला अन् चोरट्यांनी घरात साधला डाव, ४ लाखाचा मुद्देमाल लंपास
*बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या दोन अज्ञातांचा मृत्यू
बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
नागपूर/E T News
कुटुंबीय सौदी अरेबियात गेल्यानंतर चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्याने आलमारीत ठेवलेली रोकड व दागिन्यांवर डल्ला मारला. जरीपटका ठाण्यांतर्गत ही ४ लाख ८५ हजारांची घरफोडी झाली.
नूरी कॉलनी, मशिदीजवळील प्लॉट नंबर १२७ येथे सोहेल असलम खान (३५) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. खान कुटुंब विदेशात सौदी अरेबिया येथे गेले होते. ९ ऑगस्टला असलम खान यांचा मित्र त्यांच्या घरी आला असता त्याला घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. ही माहिती मित्राने असलमला दिली. घरात चोरी झाल्याल्याचेही सांगितले. २९ आॅगस्टला खान कुटुंब नागपूरला परत आले. घराची पाहणी केली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील असलमच्या आई यांच्या आणि वहिणींच्या बेडरूममधील ठेवलेली ४ लाखांची राकड आणि सोन्या-चांदिचे दागिने असा एकूण ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी असलम यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी विरूद्ध कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला अटक
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या आरोपीला हिंगणा पोलिसांनी अटक केली आहे. विजय केशव एटरे (२९, रा. वार्ड नंबर १५, धनगरपूरा, हिंगणा) असे या आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलीची नेहमीच छेड काढत होता.
पीडिता ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. विजय एटरे हा तिच्या मागावर असायचा. महविद्यालयात येताना तसेच जातेवेळी तिला तो रस्त्यात अडवून तिची छेड काढायचा. २० ते ३१ आॅगस्ट दरम्यान, त्याचे हे कृत्य सुरू होते. दिवसेंदिवस त्याची हिंम्मत वाढत होती. पीडितेने तिच्यापरीने त्याला अनेकदा हटकले तरी तो तिच्या सतत मागावर होता. पीडिता आणि तिच्या दोन मैत्रिणी सोबत महाविद्यालयातून येत असतानाही विजयने यापूर्वी पीडितेला रस्त्यात अडवून छेडखानी केली. ३१ आॅगस्टला पीडित मुलगी ही महाविद्यालयातून घरी जाण्याकरिता दुचाकीने निघाली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास विजयने तिचा नेहमीप्रमाणे पाठलाग सुरू केला. मिहानकडे जाणा-या मार्गावर विजने त्याची दुचाकी पीडितेच्या दुचाकीपुढे आडवी लावली. तिला थांबवून त्याने तिचा हात पकडला आणि बळजबरीने तिला मोबाईल क्रमांक मागू लागला. तिने नकार दिल्यावर त्याने तिच्यासोबत अश्लिल कृत्यकरत तिचा विनयभंग केला. यानंतर पीडितेने हिंगणा पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ७४, ७५, ७८, ७९, १२६ (२) भादंवि सहकलम ८, १२ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेची तत्काळ दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी स्टाफसह घटनास्थळी पोहोचून विजय एटरे याला अटक केली.
—————————————–
कुटुंब गेले मुंबईला अन् चोरट्यांनी घरात साधला डाव, ४ लाखाचा मुद्देमाल लंपास
पारडी ठाण्यांतर्गत चोरट्याने एका घरातून ३ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. घरचे सदस्य मुंबईला गेले असता चोरट्याने घरात संधी साधली. २५ ते ३० आॅगस्ट दरम्यान ही घटना घडली.
शारदानगरातील प्लॉट नंबर येथील रहिवासी चंदा रामभाऊजी बावणकर (५८) या कुटुंबीयांसह मुंबईला गेल्या होत्या. पाच बावणकर कुटुंब मुंबईलाच होते. इडके चोरट्याने घरात डाव साधला. चोरट्याने घराच्या दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील आलमारीतील ठेवलेली ४० हजारांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याप्रकरणी चंदा बावणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
——————————–
बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या दोन अज्ञातांचा मृत्यू
विविध घटनेत बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या दोन इसमाचा मृत्यू झाला. तहसील आणि कळमना ठाण्यांतर्गत या घटना पुढे आल्या. पहिल्या घटनेत ३१ आॅगस्टला सकाळी १०.५५ वाजताच्या सुमारास तहसील हद्दीतील मेयो रुग्णालयाच्या अपघात विभागात एक अनोळखी अंदाजे ७० वर्षाचे ज्येष्ठ नागरिक बेशुध्द अवस्थेत मिळून आले. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना १ सप्टेंबरला मध्यरात्रीनंबर १.३८ वाजता तपासून मृत घोषित केले. दुस-या घटनेत ३१ आॅगस्टला सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या दरम्यान, फुटपाथवर एक अनोळखी ईसम वय अंदाजे ३० वर्ष हे बेशुध्द अवस्थेत मिळून आले. त्यांना उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल के ले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दोन्ही घटनेत प्राप्त वैद्यकीय सूचना तसेच तक्रारीवरून स्थनिक पोलिसांनीअकस्मात मृत्यूची नोंद घेतलेली आहे.
प्राणघातक शस्त्रासह गुंडाला अटक
मोक्काच्या गुन्ह्यातील शोधात असलेला आरोपी पोलिसांना गवसला. प्राणाघातक शस्त्रासह त्याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखच्या युनिट क्रमांक ४ च्या पथकाने ही कारवाई केली. मोहम्मद अकरम उर्फ तिर्री वल्द मोहम्मद असलम (३१, रा. सर्वश्रीनगर, एनआयटी गार्डनजवळ, दिघोरी) असे या गुंडाचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पथक ३१ आॅगस्टला पेट्रोलिंग करत होते. रात्री १०.२२ वाजताच्या सुमारास सक्करदा ठाण्यांतर्गत असलेल्या महेश बार समोर, दिघोरी चौकातील त्यांना अकरम दिसून आला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याची विचारपूस करून अंगझडतील घेतली. त्याच्याजवळ एक लोखंडी चाकु सापडला. अकरमला पोलिसांनी ठाण्यात आणले. अभिलेख तपासला. तो सक्करदरा ठाण्यांर्गत मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. अकरम विरूद्ध सक्करदरा ठाण्याचे पोलिस हवालदार युवानंद कडू यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम ४, २५ भा.ह.का., सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक केल्यानंतर सक्करदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
दुचाकीने कामावर जात असलेल्या एका व्यक्तीला भरधाव बस चालकाने धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सीताबर्डी ठाण्यांतर्गत हा अपघाताची ही घटना घडली. जगदीश नत्थूजी गावंडे (४९) असे अपघातात गंभीर झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मानेवाडा रोड, शाहुनगर प्लॉट नंबर २१ येथे जगदीश गावंडे राहतात. ते ३१ आॅगस्टला रात्री ६.४५ वाजता नेहमीप्रमाणे रेल्वे स्थानकावर कामावर निघाले. दुचाकी (एमएच ३१ डब्ल्यूएस १८४७) ने जाताना लोहापूल माता मंदिराजवळ ते पोहोचले. यावेळी, बस (एमएच ४० एक्यू ६४४३) च्या चालकाने त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत जगदीश यांच्या दुचाकला धडक दिली. अपघातात जगदीश गंभीर जखमी झाले. रेल्वे रुग्णालयात त्यांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. येथे डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी जगदीश यांनी दिलेल्या बयानावरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपी बस चालकाविरूद्ध कलम २८१, १२५ (ब), ३२४(२) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.