Breaking
ब्रेकिंग

यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण मयूर रंगारीचा सत्कार 

0 1 8 5 2 1

यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण मयूर रंगारीचा सत्कार

जवाहरनगर /E T News

रविवार २१ जुलै धम्मकाया बुद्ध विहार सावरी येथे मयूर दिपक रंगारी यांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला. कोंढी जवाहर नगर येथील रहिवासी दिपकजी रंगारी यांचे सूपूत्र मयुर रंगारी यांनी यूपीएससी परीक्षेत आल इंडिया २४८ रैंक मिळवून सिएपीएफ मध्ये अस्सिटेंट कमान्डेंट म्हणून त्यांची नियुक्ति झाली आहे, अतिशय प्रतिकूल परिस्थितित मयुर रंगारी यांनी इतके मोठे यश संपादन करून संपूर्ण भंडारा जिल्हाचा मान वाढविला आहे. मयुरचा धम्मकाया बुद्ध विहार सावरी येथे जाहिर सत्कार करण्यात आला, या प्रसंगी धम्मकाया बुद्ध विहार समिति, सुजाता महिला मंडळाच्या सदस्यांनी त्यांना भारतीय संविधानाची प्रत आणि शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी मयुर रंगारी यांनी यूपिएससी परीक्षेत यश संपादन करण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजे याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या सत्कार समारोहाचे अध्यक्षस्थान जि.प.सावरी सदस्य प्रेमभाऊ वणवे यांनी भूषविले, अध्यक्षीय भाषण संबोधित करतांना त्यांनी प्रत्येक गावात असे गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी पालकांनी व लोकप्रतिनिधिंनी पुढाकार घ्यावे असे सांगितले.या सत्कार समारोहात प्रमुख अतिथि म्हणून पं.स. सावरी सदस्या भाग्यश्रीताई कांबळे यांनी प्रत्येक विहारात ई लायब्रेरी व स्टडी सर्किल ची निर्मिती व्हावे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी सावरी ग्रामपंचायत चे सरपंच गिरीशभाऊ ठवकर उपस्थित होते त्यांनी मयुर रंगारी यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कर्त्व्यासाठी शुभेच्छा देऊन गावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी व विहाराच्या सौंदर्यीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत कडून मदतिचे आश्वासन दिले.

सत्कार समारोहात प्रमुख अतिथि म्हणून उपसरपंच संदिपजी नागदेवे, सामाजिक कार्यकर्ता भिमरावजी लाडे आणि गावातील असंख्य लोक उपस्थित होते. सत्कार समारोहानंतर वर्षावासानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन संदिपजी गजभिये, राजेश शामकुवर आणि मनिषाताई ढोणे यांनी केले व हंसराजजी नागदेवे सर यांनी आभार प्रदर्शन केले,समितीचे अध्यक्ष जिवनजी भांबोरे, सचिव रंजित कानेकर सुजाता महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाताई कांबळे व इतर सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे सफल आयोजनासाठी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे