पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती

पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती
कामठी येथील पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची क्रीडा शिष्य वृत्ती साठी निवड झाली आहे.. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी अनुक्रमे ईशांत तेलंग व अभिमन्यू कुशवाह यांनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवून महाविद्यालयाचे व स्वतःचे नाव लौकीक केले.
इयत्ता १२ वी चा (कला शाखेचा ) इशांक तेलंक याने हातोडा फेक मध्ये द्वितीय स्थान पटकाविले. तसेच अभीमन्यू कुशवाह (विज्ञान शाखा) याने गोळा फेक मध्ये द्वितीय स्थान पटकाविले.
ही स्पर्धा चंद्रपूर येथील बल्लारपूर (इसापूर) येथे दिनांक २९ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर २०२३ मध्ये आयोजीत करण्यात आली होती. सदर स्पर्धा युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत क्रीडा समिती द्वारा आयोजित करण्यात आली होती.या
स्पर्धेसाठी पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षिका प्रा. मल्लिका नागपुरे यांनी विशेष मोलाचे मार्गदर्शन केले. या दोन्ही
क्रीडा शिष्यवृत्ती स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक प्रा. वंजारी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदानी त्याचे अभिनंदन केले.