Breaking
ब्रेकिंग

आरक्षणाच्या अंमलबजावणीकरिता नारायण बागडे उपोषणाला बसणार

२६ जुलैपासून आंदोलनाचा इशारा

0 1 8 5 2 1

आरक्षणाच्या अंमलबजावणीकरिता नारायण बागडे उपोषणाला बसणार

२६ जुलै पासून आंदोलनाचा इशारा

नागपूर/E T News

छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात माहार मांग, चांभार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना महाराजांनी आर‌क्षण देवून समता बंधुता न्याय स्थापीत केले तो दिवस म्हणजे २६ जुलै डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या या कार्याला संविधानात समाविष्ट करून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला मोठ्या कष्टाने मिळवलेल्या आरक्षण आज धोक्यात आले आहे याची तंतोतंत पालन अंमलबजावणी होतांना दिसत नाही या करिता शासनाचे व विरोधी पक्षाचे लक्ष वेधण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे येत्या २६ जुलै पासून नागपूर येथील संविधान चौकात उपोषणाला बसणार आहेत.

अनुसूचित जाती जमाती, यांना कोणत्याही संघर्ष न करता आरक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने मिळाले या आरक्षणाच्या माध्यमातून समाजात मोठ मोठ्या पदावर आणि राजकारनात मंडळी गेली परंतु हीच मंडळी आज मुंग गिळून गप्प बसले आहेत विध्यार्थ्यांना वेळेस शिष्यवृत्ती नाही, शैक्षणिक आरक्षणाचा कोटा नदारत आहे, बेरोजगार तरुणांना, महिलांना महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे,संत रोहिदास आर्थिक महामंडळात हेलपाटे मारावे लागतात, रमाबाई घरकुल योजना थंडा बस्थात, जातीचे प्रमाणपत्राची जाचक अट, या विषयावर समाजात मोठी निराशाजनक चिंता व्यक्त होत आहे या कडे आंबेडकरी नेते उदासीन आहेत आपले सोडून दुसऱ्याच्या नांदी लागलेली नेते मंडळी आज सक्रिय दिसत आहे बागडे सरांच्या उपोषणाला संपूर्ण राज्यात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आंबेडकरी महिला मोर्चा यांच्या पाठींबा राहणार आहे या साठी साहित्य भुषण अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई येथील सुमन नगर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जनजागृती करण्यात येणार आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष विकास काटे यांनी पत्रकारांना सांगितले.

1/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे