पं. दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदयाचा विचार हाच आत्मनिर्भर भारताचा उगमस्थान – देवराव भोंगळे

पं. दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदयाचा विचार हाच आत्मनिर्भर भारताचा उगमस्थान – देवराव भोंगळे
सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी.
(राजुरा तालुका प्रतिनिधी – रंगराव कुळसंगे)
राजुरा/E T News
एकात्म मानवतावादाचे प्रणेते आणि जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दिनदयाल उपाध्याय जी यांनी त्यावेळेस मांडलेला अंत्योदयाचा समग्र विचार हाच आजच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा उगमस्थान आहे; आणि अंत्योदयाच्या उन्नतीच्या विचार करूनच मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी झटत आहेत. अशी भावना भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली.
राजुरा येथील मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपर कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतीमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आली.
पुढे बोलताना, खरंतर विकासाची गंगा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी अंत्योदयासारखा महान विचार देण्याचं कार्य पंडित दिनदयाल उपाध्याय जी यांनी केला, यासोबतच जनसंघाच्या जडणघडणीतही त्यांचा मोठा वाटा आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणायचे, ‘मला फक्त दोन दिनदयाल द्या मी संपुर्ण भारतात क्रांती घडवू शकतो’ असे साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे व्यक्तिमत्व असलेले पंडित दिनदयाल उपाध्याय जी यांचे विचार आम्हाला सदैव प्रेरणा देतात. असेही ते म्हणाले.
याप्रसंगी तालुका महामंत्री दिलीप गिरसावळे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय राठोड, तालुका सचिव दिपक झाडे, शहर उपाध्यक्ष विनोद नरेन्दुलवार, भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रफुल्ल घोटेकर, सुधाकर पिंपळशेडे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.