रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राजुरा येथे 67 वा वर्धापन दिन समारोहाचे आयोजन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राजुरा येथे 67 वा वर्धापन दिन समारोहाचे आयोजन
– 3 ऑक्टोबर ला सुपर मार्केट हॉल राजुरा येथे पार पडणार वर्धापन दिन सोहळा.
(राजुरा तालुका प्रतिनिधी – रंगराव कुळसंगे)
राजुरा/E T News
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राजुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुपर मार्केट हॉल, आसिफाबाद रोड येथे दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 11:30 वाजता 67 वा वर्धापन दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार, भीमशाहीर संभाजी ढगे यांचा आंबेडकरी जलसा राहील.
तर दुपारी 1 वाजता उद्धाटन समारोह व आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा राहील. कार्यक्रमाचे उदघाट्क म्हणून नेताजी बुरचुंडे, माजरी यांची उपस्थिती राहिल. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धार्थ पथाडे राहतील तर विशेष अतिथी म्हणून डॉ. सत्यपाल कातकर, भारत थुलकर, जी. के. उपरे, पवन भगत, हरिष दुर्योधन, अंकुश वाघमारे, निवारण कांबळे, विदर्भ संघटक, समता सैनिक दल आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 67 वा वर्धापन दिन समारोह आयोजन समितीने केले आहे.