नवनित विद्यालय खमारी (बुज.) या शाळेची शैक्षणिक सहल

नवनित विद्यालय खमारी (बुज.) या शाळेची शैक्षणिक सहल
भंडारा/प्रतिनिधी
मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशिय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा द्वारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) या शाळेची शैक्षणिक सहल दि. ४ जानेवारी २०२५ ला वर्ग ८ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सेवाग्राम वर्धा, पवनार, नागपूर विमानतळ, दिक्षा भूमी, अंबाझरी गार्डन, महाराज बाग, रमण विज्ञान केंद्र, स्वामीनारायण मंदिर, कोराडी जगदंबा माता मंदिर येथे आयोजित करण्यात आली. सहलीमध्ये ८६ विद्यार्थी व ८ शिक्षक कर्मचारी वर्गांनी सहभाग घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वातावरण व अनुभव मिळाला, प्रत्यक्ष ज्ञानाची अनुभूती झाली, विद्यार्थ्यांचे ज्ञान वृध्दींगत होवून कल्पना शक्ती व आकलन शक्तीला वाव मिळाला. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, सर्वांगीण विकास साधता यावा म्हणून तणावरहित व अनौपचारिक वातावरणा मध्ये मोठ्या उत्साहात एस टी बस मधून स्थळांना भेटी देवून विद्यार्थ्यांनी मनमूराद आनंद घेतला. सहल प्रमुख प्रा. नानाजी गजभिये यांनी सहलीचे नियोजन संस्थेचे विश्वस्त हिरालाल गजभिये, मुख्याध्यापक नरेंद्र गणविर, सुनिल नागदिवे, सुमिता गजभिये, निर्मला रंगारी, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. अरुण कांबळे यांच्या सहकार्याने केले.