काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा 3758 किलोमीटर एवढे अंतर सहा दिवस बारा तासात पूर्ण
काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा 3758 किलोमीटर एवढे अंतर सहा दिवस बारा तासात पूर्ण
नागपूर
इंडियन ऑइल रेस क्रॉस स्पर्धा मध्ये सूर्योदय लेख गार्डन ग्रुप तर्फे कोच संजय वाकडे व रुपेश मेश्राम यांनी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल रेस 3758 किलोमीटर एवढे अंतर सहा दिवस बारा तासात पूर्ण केल्याबद्दल सूर्योदय लेख गार्डन ग्रुप सक्करदरा यांच्यावतीने कोच संजय वाकडे व रुपेश मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारामध्ये सूर्योदय लेक गार्डन ग्रुपचे अध्यक्ष श्री वासुदेव मानकर, माजी अध्यक्ष एम.डी. भोयर, देवाजी ठाकरे, ज्ञानेश्वर महाकाळकर, हजारे जी, आखूड गुरुजी, चौधरी जी, विलास भागवते आणि इतर सर्व ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
स्पर्धक रुपेश मेश्राम व कोच संजय वाकडे यांनी सदर प्रतिनिधीशी बोलतानाना सांगितले की 3758 किलोमीटर एवढे अंतर केवळ सहा दिवस बारा तासात पूर्ण केले त्यामध्ये त्यांना काय काय प्रॉब्लेम्स आले आणि ही रेस कशी पूर्ण केली याची सविस्तर माहिती सांगितली.