25 विधवा महिलांच्या जीवनाशी खेळ, शारीरिक संबंध ठेवत लुबाडले लाखो रुपये, आरोपी जेरबंद

25 विधवा महिलांच्या जीवनाशी खेळ, शारीरिक संबंध ठेवत लुबाडले लाखो रुपये, आरोपी जेरबंद
विशेष प्रतिनिधी/ET News
महिलांना आमिष दाखवून त्यांना लुबाडण्याच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. महिलांना आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्यांना जीवनातून उदध्वस्त केले जात आहे.
यातील बहुतेक घटना या ऑनलाइनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घडल्याचे दिसून येत आहे. अनेक महिला लग्न जुळविण्याकरिता ऑनलाइनच्या माध्यमातून परपुरुषाशी संपर्क साधतात आणि त्यातूनच असे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत त्याकरिता महिलांनी ऑनलाइन द्वारे अशा अनोळखी इसमांशी संपर्क न साधता मध्यस्थीमार्फत संपर्क साधल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात.
असाच एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. एक नव्हे तर तब्बल 25 विधवा महिलांची फसवणूक करून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला कोल्हापूर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
सदर आरोपी हा पुण्यातील रहिवासी आहे. सदर आरोपीचे नाव फिरोज निजाम शेख, असे आहे.
कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचून पुण्यात त्याला अटक केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार, कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरविली व पुण्यात आरोपीला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.
३२ वर्षीय फिरोज निजाम शेख हा सध्या पुण्यातील कोंढवा येथील निवासी आहे. तो मूळचा गंगावळण, इंदापूर येथील आहे. इंदापूरमध्येही आरोपी फिरोज विरोधात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
फिरोजने या विधवा महिलांना लग्नाचे आमिष दाखवत फसवणूक केली आहे. आरोपीने या विधवा महिलांकडून पैसे उकळल्याचेही तपासात समोर आले आहे.
आरोपीने या विधवा महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचेही कबूल केले आहे. आरोपीने आणखी किती महिलांची फसवणूक केली आणि कोण कोणते गुन्हे केले आहेत याची चौकशीही गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.
——————+++