Breaking
ब्रेकिंग

अमरावती विभागातून नांदगाव खंडेश्वर आयटीआय उत्कृष्ट

मुंबई येथे मंत्र्यांच्या हस्ते मिळाला पुरस्कार

0 1 8 5 2 1

नांदगाव खंडेश्वर/E T News

नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नाविन्यपूर्ण योजना राबविणे, प्रशिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देणे, प्रवेश क्षमतेप्रमाने १०० टक्के प्रवेश करणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या कल्याणाकरिता विविध उपक्रम राबविणे, स्मार्ट क्लास रूम, सीसीटिव्ही कॅमेरामध्ये निगराणी, खेळाचे मैदान, प्रशिक्षणार्थ्यांकरिता जिम, शुध्द पाण्याची व्यवस्था यांसह अनेक सुविधा प्राचार्य नंदनसिंह भूकवाल यांच्या मार्गदर्शनात उपलब्ध केल्यामुळे कौशल्य विभागातर्फे नांदगाव खंडेश्वर आयटीआयला विभागस्तरावरून प्रथम पुरस्कार मुंबई येथे देण्यात आला आहे.

 

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या निर्णयान्वये राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिल्प कारागिर प्रशिक्षण योजना उत्कृष्टपणे राबवून राज्यातील /देशातील उद्योग क्षेत्रात आवश्यक तंत्रकुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्याचे कार्य करणाऱ्या संस्थांना “उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार” प्रदान करण्याचे निर्देशित होते. त्याअनुशंगाने अमरावती विभागातून उत्कृष्ट आयटीआय म्हणून नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली. त्यानुसार “कौशल्य दिना” चे औचित्य साधून “उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था” पुरस्कार वितरण सोहळा १५ जुलै रोजी मध्यवर्ती सभागृह, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक दिगंबर दळवी आदींच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव खंडेश्वर आयटीआयला विभाग स्तरावरून प्रथम पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह व रोख एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी नांदगाव खंडेश्वर आयटीआयचे प्राचार्य नंदनसिंह भूकवाल, स्थानिक आयटीआयचे माजी शिल्पनिदेशक तथा मोझरीचे गटनिदेशक निरंजन मुरादे, शिल्प निदेशक राजेंद्र उन्होणे, दिपक गिरी, संदीप तिरमारे, चिन्मय दहाट यांची उपस्थिती होती. सदर पुरस्कार मिळाल्याने संस्थेचे शिल्प निदेशक तुषार जैन, निलेश देऊळकर, राम इखार, सुशिल सरोदे, सागर डांगे, वैभव केणे, प्रशांत पोच्ची, शहजाद खान, सचिन वाहणे, रिना जुनघरे, मयुरी वसुले, रूचिका डोरस, संगिता बिबेकर, दिपाली लोखंडे, कर्मचारी अनंत खेडकर, निलेश खंडार, मनोज पकडे, राजकुमार कांबळे, गौरव मोगरे, रवि लेंडे, संगिता राऊत, सुरक्षारक्षक धिरज तायडे, जयेश काटोलकर, धर्मदिप राणेकर आदींनी कौतूक केले आहे.

 

(बॉक्स)

 

सर्वांच्या अथक प्रयत्नातून संस्थेला पुरस्कार

संचालक दिगंबर दळवी व मा. सहसंचालक प्रदीप घुले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही संस्थेत विविध उपक्रम राबविले. संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक व कार्यालयीन कर्मचारी, प्रशिक्षणार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या अथक प्रयत्नातून संस्थेला विभागस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

नंदनसिंह भुकवाल

प्राचार्य, आयटीआय नांदगाव खंडेश्वर

फोटो ओळ – नांदगाव खंडेश्वर – मुंबई येथे आयटीआयला पुरस्कार देतांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभाग लोढा व इतर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे