Breaking
ब्रेकिंग

अवैध सावकारावर चार दिवसांत चार गुन्हे दाखल – अनेकांची मालमत्ता हडपली – इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडले : १.१३ लाखांचे साहित्य लंपास –

0 1 8 5 2 1

अवैध सावकारावर चार दिवसांत चार गुन्हे दाखल :  अनेकांची मालमत्ता हडपली


इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडले : १.१३ लाखांचे साहित्य लंपास

——————————

नागपूर/E T News

आल्या दिवसात सागर दोशी हे नाव गुन्हेगारी जगतात चांगलेच चर्चेत आले आहे. या अवैध सावकाराने कर्ज परत मिळाल्यानंतर अव्वाच्यासव्वा व्याजदर लावत अनेकांच्या चक्क मालमत्ताच हडपल्या. मागील चार दिवसात त्याच्यावर चार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

फ्लॅट नं. ३०३, बी, विंग व्यकटेश सिटी- २, बेसा येथे राहणारे संजय उत्तमराव खांडेकर(५५) यांनी सागर जयेंद्रकुमार दोशी (३७,रा. त्रिमुर्तीनगर) याच्याकडून ४ लाख कर्ज स्वरूपात घेतले होते. यातील २ लाख रुपये त्यांनी सागरला व्यासासह परत केले. अशातच सागरने संजय खांडेकर यांना अवैधरित्या व्याजावर व्याज लावण्याची भीती दाखविली. घाबरलेल्या खांडेकर यांना सागरने त्यांचे दुकान स्वत:च्या नावावर करून द्यायला लावले. दुकान मिळाल्यास तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल असले त्याने सांगितले होते. खांडेकर यांच्याकडे दुसरा पर्यायच सागरने ठेवला नसल्यामुळे नाईलाजाने त्यांनी दुकानाची सागरच्या नावावर रजिस्ट्री करून दिली. दुकान हाती लागताच त्याने पुन्हा आपले रंग दाखवणे सुरू केले. त्याने खांडेकर यांना त्यांच्या कर्जावर अजूनही १७ लाख ५९ हजार ९२५ रुपये बाकी असल्याचे सांगितले. ते घेण्यासाठी तो खांडेकर यांना दमदाटी करत होता. शिवीगाळ करत त्यांना ठार मारण्याची धमकी देत होता. यावेळी त्याची नजर खांडेकर यांच्या फ्लॅटवर होती. परंतु, सागरचा त्रास सहण्यापलिकडे गेल्यानंतर अखेर त्यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडले : १.१३ लाखांचे साहित्य लंपा

नंदनवन ठाण्यांतर्गत असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंगचे दुकान चोरट्याने फोडले. दुकानातून मोबाईल, ईअर फोन, र्स्मार्ट वॉच आदीसह १ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लकडगंज येथील आदर्शनगर, गरोबा मैदानाजवळ राहणारे फिर्यादी रमन कवडुजी ठाकरे (२८) यांचे नंदनवन ठाण्यांतर्गत श्रीकृष्णनगर चौकातील हनुमान मंदिराच्या बाजुला रॉयल मोबाईल अ‍ॅण्ड ईलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंग सेंटर आहे. ३० ते ३१ जुलै दरम्यान, त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केले आणि घरी गेले. दरम्यान, कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानाचे शेटर्सचे लॉक तोडले आणि आत प्रवेश केला. दुकानात ठेवलेले आयफोन, वनप्लस व ईतर ५ मोबाईल, वेग-वेगळया कंपनीचे ईअरफोन, स्मार्ट वॉच, ७ हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण १ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी रमन ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


—-

 

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे