तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अभिषेक ईखारची चमकदार कामगिरी
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अभिषेक ईखारची चमकदार कामगिरी
कामठी/E T News
पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी अभिषेक ईखार याने बुद्धिबळ स्पर्धेत तालुकास्तरावर चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी क्वालिफाय झाला. अभिषेक ईखारने बुद्धिबळ स्पर्धेच्या सहा राऊंड मध्ये विजय प्राप्त करत आपला उच्चांक कायम ठेवला. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत द्वारा आयोजित ही स्पर्धा खसाळा व मसाळा येथील मेरी पॉसपीन्स येथे घेण्यात आली होती..या विजयाने जिल्हास्तरावर होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. या स्पर्धेत त्याला कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका प्राध्यापिका
मल्लिका नागपुरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक प्राध्यापक व्ही.बी. वंजारी यांनी विजेत्या स्पर्धेकाचे अभिनंदन केले. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.