कामगार नगरातील आगीत छत्तीसगडी मजुरांच्या झोपड्या जळून खाक

कामगार नगरातील आगीत छत्तीसगडी मजुरांच्या झोपड्या जळून खाक
राजुरा, ता.प्र. –
राजुरा तालुक्यातील रामपूर जवळील कामगार नगर येथे आज दि. 24 एप्रिल ला दुपारी दोन वाजताचे दरम्यान या भागात मजुरीसाठी आलेल्या छत्तीसगडी लोकांच्या झोपडयांना आग लागली. या सर्व सात ते आठ झोपड्या जळून खाक झाल्या. राजुरा अग्नीशमन दलाने येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सर्व झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या झोपण्याच्या कोंबड्याच्या खुराड्यात बांधून असलेले दहा कोंबडे जळून खाक झाले. शेजारी कुणीतरी कचरा जाळ्यामध्ये पसरत येऊन झोपड्या जाळल्या, अशी चर्चा आहे. मात्र आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
या आगीत सर्व झोपडीतील रहिवाश्यांचे कपडे, धान्य, भांडे व घरगुती सर्व साहित्य जळाले. याशिवाय घरी ठेवलेली रक्कमही जळून गेली. सुदैवाने यावेळी सर्व मजुर व त्यांची मुले कामावर गेल्याने कुणीही झोपडीत नव्हते. हे मजूर या भागात अतिशय मेहनतीचे असे बांधकाम व मातीकाम करतात. त्यांचे या आगीत मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या कुटूंबाला मदत करावी, अशी मागणी कामगार नगर येथील नागरिकांनी केली आहे
———.