11 ऑगस्टला नागपूर येथे भोई गौरवतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
11 ऑगस्टला नागपूर येथे भोई गौरवतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर/E T News
भोई गौरव मासिकाच्या वतीने येत्या 11 ऑगस्ट 2024 ला *विदर्भ हिंदी साहित्य संघ झाशी राणी चौक सीताबर्डी नागपूर* येथे भोई समाजातील *गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.* तसेच याच कार्यक्रमात वधू-वर परिचय नोंदणी सुद्धा करण्यात येणार आहे.ज्या विद्यार्थ्यांना वर्ग दहावी मध्ये 85% व वर्ग बारावी मध्ये 75% टक्के व त्याच्यावर गुण मिळाले आहेत तसेच 2023- 24 या कालावधीत जे विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस, बी एम एस, पीएचडी प्राप्त तसेच नीट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे.
या सत्कारासाठी 31 जुलै पर्यंत माहिती मागविण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी ही माहिती पाठवली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. *सामाजिक दायित्वाच्या भावनेतून दरवर्षी भोई गौरव मासिकाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात.* त्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून हा एक उपक्रम आहे.या विद्यार्थी सत्कार समारंभाला अध्यक्ष म्हणून सर्वोदय महाविद्यालय शिंदेवाडी जिल्हा चंद्रपूर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश डहारे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे सुप्रसिद्ध कान, नाक, घसा व कॅन्सर तज्ञ डॉक्टर अजय कांबळे, भंडाऱ्याचे सुप्रसिद्ध हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉक्टर अविनाश न्हाने, प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नागपूर चे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण ढाले तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक व एम. बी. पटेल कॉलेज देवरी जिल्हा गोंदिया या महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा गंगणे उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
बारावी नंतर पुढे काय… असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर निर्माण होतो. अनेकदा योग्य मार्गदर्शनाशिवाय विद्यार्थ्यांची दिशा भरकटली जाते व आयुष्यभर त्याचा पश्चाताप करावा लागतो. या विषयावर विद्यार्थी व पालकांना तज्ञांचे मार्गदर्शन लागणार आहे.
या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भोई गौरव मासिकाचे मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे तसेच संपादक मंडळातील सर्व सदस्यांनी केले आहे.