Breaking
ब्रेकिंग

कर्ज चुकविण्यासाठी केली चोरी : गेमिंग झोनच्या घटनेचा उलगडा –  दोन अल्पवयीनसह तिघांना अटक

0 1 8 5 0 5

कर्ज चुकविण्यासाठी केली चोरी : गेमिंग झोनच्या घटनेचा उलगडा –  दोन अल्पवयीनसह तिघांना अटक

नागपूर/E T News

कर्ज वाढल्याने त्याच्या परतफेडीसाठी एका तरुणाने थेट चोरीचा मार्ग पत्करला. तरुणाने कटात त्याचा अल्पवयीन भाऊ आणि मित्रालाही सहभागी केले. त्यांनी योजना आखत नरसाळा रोडवरील गेमिंग झोनमध्ये चोरी केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. चोरीचा माल विक्रीच्या तयारीत असतानाच पोलिसांनी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करत अन्य दोन अल्वयीन आरोपींनाही ताब्यात घेतले. जयेश मोरेश्वर सतिकोसरे (२१, रा. राधाकृष्णनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

बेलदारनगर परिसरात टाईम ब्रेक ई स्पोर्ट लाऊंज नावाने व्हिडीओ गेम पार्लर आहे. पवन बोकडे (२७) या पार्लरचे मालक आहेत. पार्लमध्ये मागील चार दिवसांपूर्वी जयेश व त्याच्या साथीदारांनी चोरी केली. पार्लचे कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला. येथील ३ लाख २० हजारांची उपकरणे चोरून नेली होती. तक्रारीनंतर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासात पोलिसांना चोरीत जयेश आणि त्याच्या भावाचा हात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे हात तिन्ही आरोपींपर्यत पोहोचले. आरोपींच्या चौकशीत त्यांनी व्हिडीओ गेम खेळण्याचा छंद असल्याचे सांगितले. जयेश व्हिडीओ गेम खेळण्यासाठी पवनच्या गेमिंग झोनमध्ये जात होता, अशी माहिती मिळाली. तसेूच, जयेशने एका नातेवाईकाकडून काही पैसे उसणे घेतले होते. त्याच्यावर पैसे परत करण्याचा दबाव होता. यातून तणावात असालेल्या जयेशने गेम झोनमध्ये चोरीची योजना बनवली. चोरी केलेले साहित्य विकून तो पैशांची व्यवस्था करणार होता.

————————————

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे