किसान जिनिंग तुलाना येथे दोन चिमुकले ट्रॅक्टर ग्रेडर मध्ये चिरडली
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी रंगराव कुळसंगे ——————————————————
किसान जिनिंग तुलाना येथे दोन चिमुकले ट्रॅक्टर ग्रेडर मध्ये चिरडली
राजुरा/E T News
राजुरा तालुक्यातील तुलाना जवळ असलेल्या किसान कापसाच्या जिनींग मध्ये ट्रॅक्टर – ग्रेडर मशीन ने कापूस भरण्याचे काम सुरू असतांना तिथे खेळत असलेली दोन मुले समोरच्या भागात येऊन चिरडली गेल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 11 नोव्हेंबर ला दुपारी 5 वाजता चे दरम्यान घडली. या घटनेत निशा कुमारी उईके, वय 2 राहणार राजनांदगाव ( छत्तीसगड ) ही मुलगी जागीच ठार झाली तर दुसरा मुलगा प्रेम ज्ञानेश्वर काष्टमवार, वय 7 वर्षे, राहणार इंदीरानगर, राजुरा हा गंभीर जखमी झाल्याने त्याला राजुरा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र येथे येताच त्याचा मृत्यू झाला.
या दोन्ही मुलांचे आई – वडील राजुरा येथील श्री. राधेश्याम अडाणिया यांच्या मालकिच्या किसान जिनींग येथे काम करतात. ही मुले याच परिसरात राहातं असल्याने कापसाच्या ढीगाजवळ खेळत होती.
ट्रॅक्टर – ग्रेटर मशीन द्वारे काम सुरू असतांना समोर कापसाजवळ असलेली मुले न दिसल्याने चालकाने मशीन ने कापूस भरला. यात ही दोन्ही मुले सापडली आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत नंतर उपजिल्हाb रुग्णालयात नागरिकांनी एकच गर्दी केली.
राजुरा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.