Breaking
ब्रेकिंग

दोन चोरट्यांनी घेतला तिसऱ्या चोरट्याचा जीव – पुलाच्या बांधकामावरील लोखंड चोरताना घडली घटना

0 1 8 5 2 1

दोन चोरट्यांनी घेतला तिसऱ्या चोरट्याचा जीव – पुलाच्या बांधकामावरील लोखंड चोरताना घडली घटना

लोकशाही वार्ता/नागपूर

दोन दिवसांपूर्वी वाठोडा हद्दीत एका किराणा दुकानाच्या ओट्यावर आढळलेल्या रक्तबंबाळ मृतदेहाच्या घटनेमागील कारणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्र. ४ च्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील मृतक हा एका पुलाच्या खाली बांधकामावरील लोखंड चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत होता. त्याचवेळी पुलाच्यावर दुसरे दोन चोर चोरलेले लोखंड वरून खाली फेकत होते. याचवेळी वरून खाली फेकलेली लोखंडी वस्तू खाली चोरी करीत असलेला चोरट्याच्या डोक्यावर आदळली आणि तो मरण पावल्याचे उघडकीस आले आहे.

वाठोडा हद्दीतील प्रजापती चौकातील अग्रवाल किराणा दुकानाच्या बंद गोडावून समोरील ओट्यावर मनोज बंगाली बंजारे (२८) याचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला होता. मनोज बंजारे हा भंगार वेचण्याचे काम करीत होता. त्याचे राहण्याचे निश्चित ठिकाण नव्हते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता मनोज बंजारे हा ओट्यावर पडलेला आणि त्याच्या डोक्याच्या मागील भागातून रक्त निघत असल्याचे आढळले.

२३ जुलैच्या सकाळी ९ ते २४ जुलैच्या पहाटे ६.३० वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने, अज्ञात कारणावरून कोणत्यातरी हत्याराने त्याच्या डोक्यावर मारून ठार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मृतकाचा भाऊ किसन बंगाली बंजारे (३५, रा. आदर्श नगर झोपडपट्टी, नंदनवन, नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट क्र. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहीतीवरून तसेच तांत्रिक तपास करून आरोपी आशिष उर्फ लल्ला राजन तिवारी (२६) व रिंकू उजागरसिंग राजपूत (२६, दोघेही रा. प्रजापतीनगर, वाठोडा, नागपूर) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून विचारपूस केली असता त्यांनी मनोज बंजारेची हत्या केल्याचे कबुल केले.

हे दोन्ही आरोपी चोर असून घटनास्थळी सुरू असलेल्या एका पुलाच्या बांधकामावरून रात्रीच्या सुमारास लोखंडी वस्तू चोरून नेत होते. त्या वस्तू ते वरून खाली फेकत असताना एक लोखंडी जड वस्तू खाली चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या मनोज बंजारेच्या डोक्यावर पडली आणि तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. काही वेळानंतर चोरीच्या उद्देशाने खाली फेकलेल्या लोखंडी वस्तू गोळा करण्यासाठी आलेल्या आरोपी आशिष आणि रिंकू यांना एक व्यक्ती लोखंडी वस्तू लागल्याने जखमी झाल्याचे दिसले. त्यांनी त्याला उचलून बाजुलाच असलेल्या अग्रवाल किराणा दुकानाच्या बंद गोडावून समोरील ओट्यावर आणून ठेवले आणि लोखंडी वस्तू चोरून पसार झाले.

दुसºया दिवशी सकाळी मनोज बंजारे रक्तबंबाळ अवस्थेत काही लोकांना दिसला. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. ४ चे पोलीस निरीक्षक रमेश ताले व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे