लाडक्या बहिणीच्या सदैव पाठीशी राहणारा भाऊ म्हणजे देवाभाऊ – डॉ. अनिल बोंडे
लाडक्या बहिणीच्या सदैव पाठीशी राहणारा भाऊ म्हणजे देवाभाऊ – डॉ. अनिल बोंडे
अमरावती/E T News
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अमरावती शहर व ग्रामीण द्वारा आयोजित लाडक्या बहिणीचा देवाभाऊ हा कार्यक्रम शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आभासी पद्धतीने महिलांशी संवाद साधला. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी रक्षाबंधन निमित्त सर्व महिला भगिनींना साडीचे वाटप सुद्धा करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रमांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना आभासी पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला त्यांनी म्हटले, महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बहिणींना महिना १५००/- रुपये माहेरचा आहेर मिळणार आहे. यामुळे लाखो बहिणी मिळाल्याचा मनापासून आनंद आहे. त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे. महिला लखपती झालेल्या बघण्याची, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून महिलांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, बहिणींच्या हितासाठी शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न होत आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी, असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यातून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू, या योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल.
राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. आजपर्यंत जुलै व ऑगस्ट महिन्याचे १ कोटी ३ लाख रुपये माता-भागिनींच्या बँक खात्यात जमा केले आहेत. रक्षाबंधनाची ही ओवाळणी भेट आहे. यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही.
राज्यसभा खासदार व अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी सुद्धा महिलांशी संवाद साधताना म्हटले की, संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोट्यावधी माता भगिनी देवेंद्रजींशी संवाद साधण्याकरता उत्साहीत आहे. सगळ्यांना स्वाभिमानी जगता यावं हे देवा भाऊंचा विचार आहे. माझी माता भगिनी सर्व काम करून आपल्या कुटुंबाचा डोलारा आपल्या जीवावर सांभाळते. देवेंद्र फडणीस यांनी सांगितले की महिलांच्या या जडणघडणीमध्ये राज्य सरकारचा सुद्धा हातभार लागायला हवा म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. देवा भाऊ हा सदैव आपल्या बहिणीच्या पाठीशी उभा राहणारा भाऊ आहे.
यावेळी डॉ. अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे आमदार प्रताप अडसड भाजपा विधानसभा प्रमुख गोपाल चंदन राजेश वानखडे प्रवीण तायडे किरण पातुरकर शिवराय कुलकर्णी महिला मोर्चाच्या गंगा खारकर अनिता तिखीले निविदिता चौधरी, डॉ. वसुधा बोंडे, संगीता शिंदे नितीन गुधडे, विवेक गुल्हाने रेखा मावसकर रमेश मावसकर प्रशांत देशपांडे सुरेखा लुंगारे उषाताई देशमुख भाग्यश्री देशमुख अर्चना मुरूमकर रूपाली सोंडे दत्तात्रय पाटील निलेश शिरभाते मनोज मोकलकर इंद्रभूषण सोंडे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.