Breaking
ब्रेकिंग

देवेंद्रजी हेल्मेटची बॅग घेऊन फिरायचे काय ? – ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा सवाल

0 1 8 5 2 1

देवेंद्रजी हेल्मेटची बॅग घेऊन फिरायचे काय ?

-ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा सवाल

 महाराष्ट्राच्या राजकारणातले आमच्या नागपूरचे गौरवस्थान देवेंद्रजी फडणव़ीस आम्हाला आपला अभिमान आहे.आपण आमचे स्नेही आहात तो स्नेह आपण जपता आम्ही कृतज्ञ आहोत.

आपण सर्व प्रथम नागपूरात हेल्मेटच्या सक्तीवीरोधात बीना हेल्मेट घालून बाईक चालवत आंदोलन केले होते. तरी पण आम्ही नागपूरच्या आमच्या डोक्याची सुरक्षा, संपूर्ण शरीराची नाही, सीमेंट रोडचा धसका घेत वाहन चालकाच्या हेल्मेटची सक्ती स्वीकारली.

पण आज महाराष्ट्राच्या उच्च पदाचा मुकुट आपल्या शिरी चढणार या आनंदात नागपूरकर असतांनाच दूचाकी वाहन चालकासोबतच बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेटसक्तीचा कडक फतवाच जाहीर झाला. आता वाहतुक सुरक्षेपेक्षा या फतव्याची कडक बजावणी आमचे सजग वाहतुक पोलीस करतील कारण कायद्याचे ते खरे रक्षक आहेत.

प्रश्न आहे एकच हेल्मेट सांभाळतांना वृध्दापासून सर्वांची दमछाक होते. लहान मुल सांभाळणाऱ्या आईच्या भूमीकेत जाऊन विचार करा. लहान मोपेड गाडीत एक हेल्मेट मावेल याची सुवीधा आहे. बाईकवर ती पण नाही.

आता टू व्हीलर चालवणाऱ्या चालकाने आपल्या पाठीवर झोमॅटो पार्सलसारखी हेल्मेटची कीट घेऊन फिरायचे का ? एखाद्या गरजू इमरजंसी कामासाठी जाणारा वृध्द व्यक्ती, रुग्ण, विद्यार्थी यांना सहानुभूतीने त्याचा प्रवास सुखकर करणारी सेवाच संपवणार का ? आम्ही हेल्मेटचे ओझे सांभाळायचे कसे याचे प्रशिक्षण द्या ?

हेल्मेटसक्ती मानवी शरीराच्या सुरक्षेसाठी की हेल्मेट उत्पादकाच्या भल्यासाठी ? बुक्यांचा मार आम्हाला सहन करावाच लागेल कारण राज्य आमचच आहे.

 ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक

प्रवर्तक श्रीगुरूदेव युवा मंच 

9823966282

4/5 - (2 votes)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे