Breaking
ब्रेकिंग

पिंपळोद जि.प.शाळेत शिक्षण सप्ताह – विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत

0 1 8 5 2 1

पिंपळोद जि.प.शाळेत शिक्षण सप्ताह – विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत

E T News

यवतमाळ/सुनील शिरपुरे

अमरावती-पिंपळोद येथील यवतमाळ.प.कन्या शाळा, उर्दू शाळा व जि.प.मुलांची शाळा या तिनही शाळांमध्ये शिक्षण सप्ताह या केंद्रपुरस्कृत कार्यक्रमाची सुरुवात २२ तारखेपासून झाली आहे. पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य निर्मिती, गोष्टी कट्टा, प्राणी, पक्षी, अन्न आणि भाजीपाला यांचे कार्ड बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला. याच उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून सुंदर मुखवटे तयार केले. तसेच विद्यार्थ्यांनी ससा आणि कासव यांच्या गोष्टीचे सुंदर नाट्यीकरणसुद्धा करून दाखवले. दुस-या दिवशी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित विविध उपक्रम घेण्यात आले. भौमितिक आकृत्याचे रेखाटन, अंकांची गाणी म्हणणे, ग्रंथालय पुस्तक वाचन, गोष्टींचे सादरीकरण आणि कथाकथन इ. उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी भरवून शैक्षणिक साहित्य निर्मितीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. सलग ७ दिवस हा शिक्षण सप्ताह सुरु राहणार असून क्रीडा, कला नि कौशल्यावर आधारित उपक्रम, गणितीय खेळ, शालेय पोषण आहार दिवस, तिथी, भोजन इ. प्रकारचे उपक्रम शाळेत घेण्यात येणार आहेत. या उपक्रमात शाळेतील शिक्षक आणि पालकसुद्धा सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवित आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे