पोरवाल महाविद्यालयात विधी साक्षरता अभियान कार्यक्रम संपन्न
पोरवाल महाविद्यालयात विपोरवाल महाविद्यालयात विधी साक्षरता अभियान कार्यक्रम
कामठी
कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय येथे तालुका विधी सेवा समिती कामठी यांच्या तर्फे विधी साक्षात्कार कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्यां अध्यक्षस्थानी व प्रमुख वक्त म्हणूनकामठी तालुक्याचे न्यायाधीश प्रथम श्रेणी श्रीमान कामत सर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय चव्हाण, साईबर क्राईम विभागाचे पीएसआय श्री.विवेकानन्द औटी साहेब,(साईबर क्राइम गुन्हा) अॅड.निकिता भोकरे (अंतरराष्ट्रीय बालिका दिवस) अन्य कानूनी सहायता वकील अॅड. संदीप अढाऊ, अॅड. पंकज यादव, अॅड. रीना गनवीर, अॅड.भीमा गेडाम व विधी स्वयंसेवक अश्विनी रामटेके आणि मिनाक्षी कांबळे आपल्या विषयासह कार्यक्रमला लाभले व सेवा जनजागृति चे अन्वयार्थ स्पष्ट करुण विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कर्त्तव्याची जाणीव करुण दिली. कार्यक्रमाचे संचालन अॅड.संदीप अढाऊ,तर आभार प्रदर्शन डाॅ.जीतेन्द्र तागडे सर यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.