ब्रेकिंग
वीज कोसळून २ महिला मजुरांचा मृत्यू तर ४ महिला गंभीर जखमी
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील घटना..
0
1
8
5
2
1
भंडारा/E T News

सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यात मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. दरम्यान शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांच्या अंगावर विज कोसळून २ महिलांचा मृत्यू झाला तर ४ महिला मजुर गंभीर जखमी झाल्यात.
आशा सुरेश सोनकुसरे व कलाबाई सुखा गोखले असे मृत पावलेल्या महीला मजुरांची नावे आहेत.तर रुकमा बंडू निमजे, मयना पतिराम सोनकुसरे, वंदना मधुकर जिभकाटे व निशा जिभकाटे अशी जखमी महीला मजुरांची नाव आहे. जखमी महिला मजुरांवर मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0
1
8
5
2
1