जवाहरनगर परिसरात मतीन खान यांच्या घरातून १८ लक्ष रुपयाचा मुद्देमाल लंपास
चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

जवाहरनगर परिसरात मतीन खान यांच्या घरातून १८ लक्ष रुपयाचा मुद्देमाल लंपास
चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
जवाहरनगर/E T News
जवाहरनगर परिसरातील जवाहरनगर ते परसोडी रस्त्यावरील सुयोग नगर (राजेदहे गाव) येथे मुख्य रस्त्या शेजारी वास्तव्य करणारे , आयुध निर्माणी भंडारा येथील सेवानिवृत्त अधिकारी मतीन खान यांचे घरी रविवार दिनांक १४ ते मंगळवार १६ जुलै २०२४ च्या दरम्यान चोरी झाली. या घटनेत चोरट्यांनी १८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मतीन खान व त्याचे कुटुंब नागपुर येथील अकेक्स दवाखान्यात आरोग्याची तपासणी करण्यासाठी गेले असता ,या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्या आरोपीने घराचे मुख्य दरवाजेचे कुलूप तोडून घरातील आलमारीत ठेवलेले१) ३०.५ ग्राम वजनाचे सोन्याचे नेकलेस सेट नग १ (२) २० ग्राम सोन्याची चैन नग १ (३)२० ग्राम सोन्याची चापलकंती नग १ (४) १० ग्राम वजनाचे मंगळसूत्र नग १ (५) ८ ग्राम वजनाचे.मंगळसूत्र नग १ (६) ४० ग्राम वजनाचे नाकातील नथनी नग ४ (७).३० ग्राम वजनाचे. हातातील बांगडी असे एकूण १६ तोडे सोनेचे दागिने व (८).चांदीचे शिक्के ५०० ग्राम तसेच नगदी रुपये.५६ हजार व घरातील जीवनावश्यक वस्तू आहे
बुधवार दिनांक १७ च्या रात्री १० वाजता खान कुटुंब घरी.आले असता घराचे.मुख्य दरवाजाच्या कुलूप तुटलेला.दिसल्याने घराची झडती.घेतली असता अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उजेडात येताच आज या घटनेची तक्रार जवाहरनगर पोलिसांना दिले आता आज सकाळी घटना स्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक. लोहित मतांनी आपल्या ताफ्यासह भेट दिले असून पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे.मार्गदर्शनाखाली सुधीर बोरकुटे करीत आहेत.
………….
जवाहरनगर प्रतिनिधी
सागर बागडे