*एक व्हा-नेक व्हा… संविधान दिन चिरायू हो… गगनभेदी जयघोषाचा ‘वाॅक फाॅर संविधान’*

*संविधानाच्या सन्मानासाठी हजारो पावलांचे ‘समता व न्याय-हक्कांचे’ आवाहन*’
*एक व्हा-नेक व्हा… संविधान दिन चिरायू हो… गगनभेदी जयघोषाचा ‘वाॅक फाॅर संविधान’*
नागपूर/E T News
संविधानाच्या मौलिक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी संविधान जागराचा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून संविधानाच्या सन्मानासाठी व संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज संविधान दिनाच्या निमित्ताने युवा ग्रॅज्युएट फोरम व संविधान फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘वाॅक फाॅर संविधान’मध्ये हजारोच्या संख्येने सहभागी होत नागपूरकरांनी धर्मनिरपेक्ष लोकशाही, राष्ट्रीय एकता व एकात्मतेचे आवाहन केले.
अण्णाभाऊ साठे चौक, दीक्षाभूमी पासून संविधान चौकाकडे हजारोच्या संख्येने निघालेल्या या निळ्या पाखरांच्या ‘वाॅकथाॅन’चा विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी तिरंगा दाखवून शुभारंभ केला. यावेळी माजी सनदी अधिकारी तथा संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे, रेखाताई खोब्रागडे, प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, डॉ. किशोर मानकर, जयश्री गवई, छाया मेश्राम, डॉ. जयराम खोब्रागडे, अतुलकुमार खोब्रागडे, दीपक निरंजन, दिगंबर गोंडाने, धम्मानंद मनवर प्रामुख्याने उपस्थित होते. संविधान फाऊंडेशनच्या रेखाताई खोब्रागडे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
दीक्षाभूमी स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून धर्मनिरपेक्षता तथा बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या संविधान सन्मान रॅलीने संविधान शिल्पकाराच्या समानार्थ दिलेल्या जयघोषाने सारा आकाश दुमदुमला. काचीपुरा, लोकमत चौक, पंचशील चौक, सीताबर्डी मार्गे निघालेल्या वाॅकने महानगराचे लक्ष वेधले.
संविधान चौकात माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांचे प्रमुख उपस्थितीत पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम व भंते महेंद्ररत्न यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ‘वाॅक फाॅर संविधान’चा समारोप करण्यात आला. महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी बालकांचे व आदिवासी वेशभूषेतील छत्तीसगढी महिलांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले. गुंजन हटवार यांनी ‘भारत का संविधान कितना सुंदर है’ हे गीत गाईले. कल्याण शिंदे यांनी ‘माझे काम मी केले’ ही कविता सादर केली. पल्लवी आटे यांनी संविधान चौकात संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. आयोजकांच्या वतीने अतुलकुमार खोब्रागडे यांनी ‘वाॅक फॉर संविधान’ची संकल्पना व भूमिका मांडत नागरिकांना सविधान जागराचे महत्त्व पटवून दिले. माजी सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे यांनी 2024 व 2025 या संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात ‘घर घर संविधान’ अभियान राबविण्याचे आवाहन केले. यावेळी रेखाताई खोब्रागडे, डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, छाया मेश्राम, अतुलकुमार खोब्रागडे आदी मान्यवर प्रामुख्याने विचारमंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केले. संविधान चौकातील समारोपीय आभार दिगंबर गोंडाणे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सीनियर सिटीजन फोरम, संविधान फाऊंडेशन, युवा ग्रॅज्युएट फोरम, महिला फोरम, अनेक सामाजिक संघटनांनी व निखिल रामटेके ,अमोल रंगारी,राहुल हनवते, शैलेश खोब्रागडे, आशिष सानकाले ,रोशन जांभूलकर,कैलास खोब्रागडे,प्रवीण वानखेड़े,मयूर राउत, वैशाली गोस्वामी,आरती हणवते,क्षमा मनवर, योगेश राऊत, रंजना सुरजुसे,सोनू बहाड़े,सोनाली धवने,पल्लवी वानखेड़े, रोहिणी दहीवले, विजय बेले यांनी विशेष परिश्रम घेतले.
०००००