एमबीबीएस उत्तीर्ण झाल्याबद्दल गौरव कुळसंगे यांचा सत्कार

एमबीबीएस उत्तीर्ण झाल्याबद्दल गौरव कुळसंगे यांचा सत्कार
राजुरा, ता.प्र. – रंगराव कुळसंगे
राजुरा तालुक्यातील कामगार नगर रामपूर येथील गौरव रंगराव कुळसंगे याने यशस्वीरित्या एमबीबीएस परिक्षा उत्तीर्ण करून पदवी प्राप्त केली. त्याबद्दल जय परसापेन महिला मंडळ, रामपूर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गौरव हा वेकोलि मध्ये कार्यरत एचएमएस कामगार संघटनेचे बल्लारपूर क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य व धोपताळा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रंगराव कुळसंगे यांचा चिरंजीव आहे.
यावेळी जय परसापेन महिला मंडळाच्या कामिना उईके, माया गावळे, अनिता आडे, वैशाली टेकाम, लता कुळसंगे व रंगराव कुळसंगे उपस्थित होते.
ET News ने केले अभिनंदन
एमबीबीएस उत्तीर्ण झाल्याबद्दल गौरव कुळसंगे यांचा ET News channel व everytime news live.com न्यूज पोर्टलच्या वतीने अभिनंदन करण्यात आले