गुंतवणुकीचे आमिष पडले महागात – ५६.५८ लाख गमावले
ऑनलाईन प्रशिक्षण घेणा-यानेच गंडविले : गुन्हा दाखल
गुंतवणुकीचे आमिष पडले महागात – ५६.५८ लाख गमावले
ऑनलाईन प्रशिक्षण घेणा-यानेच गंडविले : गुन्हा दाखल
नागपूर/E T News
गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडून बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत एका महिलेने ५६ लाख ५८ हजार रुपये गमावले. ऑनलाईन गुंतवणुकीसंदर्भात प्रशिक्षण घेणा-यानेच अधिक नफ्याचे जाळे फेकले आणि त्यात महिला अडकली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्लॉट नंबर ३९, शामनगर, रिलायन्स फ्रेश स्टोअर्सजवळ शुभांगी राजेंद्र खरे (५०) या वास्तव्याला आहेत. त्या राम इन्व्हेस्ट अकॅडमी या टेलीग्राम व व्हाट्सअॅप ग्रुपवर आहेत. या ग्रुपवर गुंतवणुकी संदर्भात ट्रेनिंग दिली जाते. या ग्रुपमधील एका अज्ञाताने शुभांगी खरे यांच्या इन्स्टाग्राम आयडीवरून एक मॅसेज पाठवला. त्यात अॅपवर आॅनलाईन प्रशिक्षण घेत तुम्ही स्वत: गुंतवणुक करून नफा मिळवू शकता, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर खरे यांनी ऑनलाईन क्लासेस केले. गुंतवणुकीसंदर्भात व माहीती मिळवली. आॅनलाईन क्लासेसमध्ये गुंतवणुकीत कसा आणि किती नफा मिळू शकतो असे सांगत एकप्रकारे त्यांचे माईण्ड वॉश केले गेले. आरोपीने अधिक नफा देण्याबाबत आश्वस्त केल्यानंतर नफ्याच्या नादात ६ मार्च ते १७ जून दरम्यान, खरे यांनी त्यांच्या बँकेतून आरोपीला ऑनलाईनरित्या गुंतवणुकीसाठी काही रक्कम पाठविली. त्यात नफा दिसून येत असल्यामुळे त्यांचे आकर्षन अधिकच वाढले आणि त्या आरोपीच्या बोलण्यात वाहवत गेल्या. याचाच फायदा उचलत आरोपीने त्यांच्याकडून वेळोवेळी आॅनलाईनरित्याद एकूण ५६ लाख ५८ हजारांची रक्कम घेतली. ही रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी घेण्यात आली होती. दरम्यान, खरे यांनी आरोपीला गुंतवणुकीचा नफा आणि रक्कम परत मागितली. परंतु, त्याने टाळाटाळ करणे सुरू केले. यानंतर वारवार विचारणा केल्यानंतरही त्याने गुंतवणुकीचा नफा आणि गुंतवणुकीची मुळ रक्कमही परत केली नाही. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बेलतरोडी पोलिसात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुनहा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
—————————-