Breaking
ब्रेकिंग

वाहन चोरीतील १० आरोपींना अटक – कळमना पोलिसांची कारवाई  (२७ जुलै)

0 1 8 5 2 1

वाहन चोरीतील १० आरोपींना अटक – कळमना पोलिसांची कारवाई

नागपूर/ E T News ( दि. २७ जुलै)

शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना कळमना पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी तसेच वाहन चोरीचे एकूण ५ प्रकरणांचा उलगडा करत दहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पहिल्या घटनेत ६ जून ते १४ जून दरम्यान, माहेरी मध्यप्रदेशला गेलेल्या ईशा चंद्रशेखर गोडबोले (३९, रा. प्लॉट नंबर ९, नेताजीनगर, गुमगावकर यांचे घरी भाड्याने) यांच्या घरातून चोरट्याने दागिने आणि दुचाकी १ लाख १३ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासांती आरोपी आकाश विलास लांजेवार (२२, रा. शास्त्रीनगर, रामकृष्ण अपार्टमेंटजवळ, नंदनवन) याला अटक केली आहे. दुस-या घटनेत २३ जून ते २५ जून दरम्यान, शेतीकामानिमित्त उमरेड येथे गेलेल्या रोशन शंकर ईटनकर (२९, रा. प्लॉट नंबर १०२, ओमनगर, भरतवाडा रोड) यांच्या घरातून चोरट्याने दागिने व रोकड मिळून ६१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रमजान उर्फ साहील शेख आबीद (२०, रा. न्यु नेहरूनगर, हुडकेश्वर), मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहीद अंसारी (२३, रा. प्लॉट नंबर ६२, गुलशननगर, खरबी) यांना अटक केली आहे. तिस-या घटनेत १९ एप्रिल रोजी, दुपारी १ ते संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान, रुग्णालयात गेलेल्या रेणु जमुनाप्रसाद सौंदिया (३७, रा. प्लॉट नंबर ३४, वांजरा रोड, कळमना) यांच्या घरातून चोरट्याने दागिने व रोकड मिळून १ लाख ३५ हजार१५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेतील आरोपी अशपाक खान युसूफ खान (४२), शेख जाफर शेख मुजफ्फर (४०, दोन्ही रा. नुरानी मस्जिदजवळ, नवीन कामठी) यांना पोलिसांनी अटक केली. चवथ्या घटनेत १ ते २ जून दरम्यान, अंबुली किशोर वैरागडे (२९, रा. प्लॉट नंबर ११, सुर्यानगर, कळमना) यांची ७ लाखांची कार घरासामोरून चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी आरोपी उमेश वासुदेव पौनिकर (१९, रा. जुनी मंगळवारी), नरेश अंकालू महिलांगे (२७, रा. पुंजारामवाडी, कळमना), विक्की राजकुमार वर्मा (२१, रा. डिप्टी सिग्नल, पुराना बाजार चौक), दीपक जगदीशप्रसाद सोनी (२४, रा. मिनीमातानगर) यांना अटक केली. पाचव्या घटनेत १६ जुलै रोजी, धुपन यादव (६०, रा. प्लॉट नंबर ८, द्वारकानगर) या घरापुढे शतपावली करत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावले होते. यातील आरोपी मोहम्मद सोहेल वल्द मोहम्मद अफजल (२४, रा. कोळसा टाल) याला अटक करण्यात आली आहे.

—————————–

२,७०३ वाहन चालकांवर कारवाई

नागपूर –

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ८ तसेच एनडीपीएस कायद्यान्वये २ अशा १० प्रकरणांत १० जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ४ प्रकरणांत ४ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली २ हजार ७०३ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ११ लाख ५० हजार ५५० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नागपूर शहर पोलिसांनी वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या राबविली. या पुढे देखील ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. परिणामी, वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे आवाहन करण्यात आले आहे.

—————————–

अवैध दारू विक्रेत्या महिला हद्दपार

नागपूर –

अवैध दारू विक्री करून, परिसरात दमदाटी करण्यासह मारपीटीतून दहशत माजविणा-या महिलेला शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. जरिपटका पोलिसांच्या प्रस्तावावर परिमंडळ ५ च्या उपायुक्तांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर महिलेला रामटेक परिसरात सोडण्यात आले आहे. लता संभाजी देशमुख (५५) असे या आरोपीचे नाव आहे.

जारपटक्यातील इंदिरा मठ मोहल्ला, आनंदनगर रोडजवळ लता देशमुख वास्तव्याला आहे. ती अवैधरित्या दारू विक्री करते. तसेच परिसरातील लोकांना दमदाटी करणे, मारपिट करणे, अवैधरित्या दारू बाळगणे व विक्री करणे अशा प्रकारचे गुन्हे करते. तिच्या अशा वागणयातून परिसरात तिची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झालेली आहे. तिच्या अशा कृत्यातून लोकांच्या जीवाला धोका तसेच त्यांच्या मालमत्तेलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, तिच्या गुनहेगारीला आळा बसावा याकरिता तिच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, याने तिच्या प्रवृत्तीत कोणतीही सुधारणा झाली नाही. परिणामी, जरीपटक्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी तिला हद्दपार करण्यासाठी परिमंडळ ५ च्या पोलिस उपायुक्तांकडे प्रस्ताव सादर केला. त्यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता लता देशखमुख हिला शहरातून ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तिला रामटेक येथील मनसर येथे राहणा-या नातेवाईकाकडे सोडण्यात आलेले आहे. या काळात ही महिला शहरात आढळल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

———————————–

शहर वाहन चोरीत सावनेरचे पाच गुन्हे उघडकीस

नागपूर –

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ च्या पथकाने अट्टल वाहन चोरट्याला अटक केली आहे. शहरातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत पाच वाहने चोरली. ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. अक्षय शंकर बागडे (२८, रा. सिल्लोरी, पोस्ट अदासा, सावनेर, जि. नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.

माहितीनुसार, प्लॉट नंबर १३. मंगलमुर्तीनगर, नारागाव येथे राहणारे फिर्यादी लोकेश मणिराम बोपचे (२२) हे त्यांच्या दुचाकीने (एम.एच. ४० बी.बी ७१२२) ने ३० जून रोजी, रात्री ८.३० ते ८.४५ वाजताच्या दरम्यान सुगतनगर चौकात भाजी खेरदी करण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी ही लगतच असलेल्या मैदानात लावली. बाजार घेतल्यानंतर ते परत आले असता दुचाकी दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली, अशा तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ च्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी अक्षय बागडे याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने उपरोक्त वाहन चोरीची कबुली दिली. त्याने हे वाहन त्याचा साथीदार अमर सहारे व एक विधीसंघर्षग्रस्त बालक (रा. सिल्लोरी, सावनेर, जि. नागपूर) यांच्यासोबत केल्याचे सांगितले. दरम्यान, त्याने या वाहना व्यतिरिक्त गिट्टीखदान, मानकापूर पोलिस ठाण्यांस सावनेर नागपूर ग्रामीण हद्दीतुन वाहन चोरी केल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्याउ ताब्यातून १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनेतील विधीसंघर्षग्रस्त बालकाला सूचनापत्र देऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

———————————

कत्तलीसाठी गोवंशांची वाहतूक – तिघांना अटक –

१७ जनावरांची सुटका – १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर –

कत्तलीसाठी गोवंशांची वाहतूक करणा-या तिन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मानकापूर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींच्या ताब्यातून १७ गोवंशिय जनावरांसह एकूण १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पवनकुमार राजेंद्र यादव (४३), राममेहर सिंग प्रभतीलाल यादव (५९), नितीन राजेश यादव (२२, सर्व रा. गाव देरोली, अहीर, ता. नरनोल जि. महेंद्रगढ, हरियाणा) अशी आरोपींची नावे आहेत.

२७ जुलै रोजी, मानकापूर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी, त्यांना मिळालल्या माहितीवरून त्यांनी मानकापूर चौकात सापळा रचला. ट्रक (आर.जे. १८ जी.ए. ३९७५) ला थांबविले. ट्रकची पाहणी केली असता या ट्रकमध्ये ६ लाख ९५ हजारांची १७ जिवंत गोवंशिय निर्दयतेने कोंबलेल्या अवस्थेत दिसून आली. कत्तलीसाठी या जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात निषन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक पवनकुमार यादव व त्याच्यासोबत असलेले राममेहर सिंग यादव, नितीन यादव यांच्या विरूद्ध गुनहा दाखल करत त्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून १७ गोवंशीय जनावरे व वाहन असा एकूण १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व जनावरांना गोरक्षण समितीकडे सुखरूप पाठविण्यात आले आहे.

————————————-

भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

नागपूर –

प्रतापनगर पोलिस ठाण्यांतर्गत भरधाव दुचाकीच्या धडकेत एका ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. जयराज देवराज शेगावकर (रा. १, चिंतामणी अपार्टमेंट, मेन रोड, प्रतापनगर) असे या वृद्धाचे नाव आहे. ते राणाप्रतापनगरातून घरी जात असताना हा अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशोक बुध्दराम मिर्जा (३१, रा. प्लॉट नंबर २७, गोपालनगर, जोशीवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

जयराज शेगावकर हे २६ जुलै रोजी, दुपारी २.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकी (एम.एच. ३१ ई.जे. ९९६६) ने विद्याविहार कॉलोनी, सोनल डिझायनर स्टुडिओ गेट समोरील रानाप्रतापनगर येथून घरी जात होते. यावेळी, अशोक मिर्जा हा त्याची दुचाकी (सी. जी. २५ जी. ९२९१) ने भरधाव वेगाने आला. अशातच जयराज शेगावकर यांच्या वाहनाला त्याची दुचाकी धडकली. अपघातात जयराज हे वाहनासह खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांनी जखमी अवस्थेत उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान २६ जुलै रोजी, रात्री ९.१० वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयराज यांचा मुलगा वलय जयराज शेगावकर (वय ३०) याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम १०६(१), २८१ भादंवि सहकलम १८५ मो. वा. का अन्वये गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.

———————————-

वाडीतील घरफोडीतील आरोपीला अटक

नागपूर –

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ च्या पथकाने वाडी येथील एका घरफोडीच्या प्रकारणातील एका आरोपीला अटक केली आहे. वेदांत रनधिर गौर (१९, रा. पिवळी मारबत चौक) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या अन्य दोन साथिदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

माहितीनुसार, ४ जुलै रोजी, प्लॉट नंबर २५, कोहळे ले-आउट, खडगाव येथे राहणा-या फिर्यादी स्नेहल गंगाधर हरगुडे (३१) या कुटुंबीयांसह देवदर्शनाकरिता गेल्या होत्या. या दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. घरातील आलमारीत ठेवलेली २ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने व चार वेग-वेगळया कंपनीचे घड्याळ असा एकूण ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या तपासात गुन्हेशाखा युनिट क्र मांक ३ च्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी आरोपी वेदांत गौर याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने उपरोक्त गुन्ह्याची कबुली दिली. त्याने ही घरफोडी मंडला उर्फ सागर रंभाले आणि यश निमजे यांच्यासोबत मिळून केल्याचे सांगितले. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी १ हजार ५०० रुपयांची रोकड व दुचाकी असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

————————————–

तीन हद्दपार गुंडांना अटक

नागपूर-

शहर व ग्रामीण भागातून हद्दपार करण्यात आल्यानंतरही विनापरवाना शहरात वावरणा-या तीन गुंडांना सक्करदरा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिनही आरोपी एकाच ठिकाणी मिळून आले. संकेत उर्फ कुत्ती संजय दिग्रसकर (२३), गोपाल उर्फ बाला प्रमोद पिंपळकर (२२) आणि शैलेष उर्फ बाजा रामकृष्ण बोरकर (२५, तिन्ही रा. जुना बिडीपेठ, शितला माता मंदिराजवळ) अशी आरोपींची नावे आहेत.

माहितीनुसार, २५ जुलै रोजी, संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजताच्या दरम्यान पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी, मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी जुना बिडीपेठ, शिन मंदिरासामोरील मोकळ्या जागेत धाड टाकली. येथे संकेत दिग्रसकर, गोपाल पिंपळकर, शैलेष बोरकर दिसून आले. त्यांची विचारपूस केली असता ते उडवा-उडविची उत्तरे देत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे रेकॉर्ड तपासले असता तिन्ही आरोपींना शहर व ग्रामीण भागातून हद्दपार करण्यात आल्याचे दिसून आले. या तिन्ही आरोपींविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

———————————

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागपूर

कुटुंबीयातील सदस्याला हॉस्पिटलमध्ये जेवणाचा डबा देण्याकरिता दुचाकीने जात असलेल्या तरुणाला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात या तरुणाचा मृत्यू झाला. मानकापूर पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडली. आशिष मारोती वानखेडे (२४, रा. गंगानगर, गिट्टीखदान) असे मृतकाचे नाव आहे.

माहितीनुसार, २५ जुलै रोजी, सकाळी ११ वाजताच्या सुमारास आशिष वानखेडे हा त्याच्या दुचाकी (एम.एच. ३१ डब्लू.एस. ००८२) ने खासगी रुग्णालयात नातेवाईकाला जेवणाचा डबा देण्याकरिता जात होता. यावेळी, मानकापूर हद्दीत जायका हॉटेल समोरील रोडवर ट्रक (एम.एच. ३१ डब्लू ७५०७) चा चालक विनोद विठ्ठलराव पराते (४४, रा. बिना संगम, वार्ड नंबर १, ता. कामठी, जि. नागपूर) याने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत आशिषच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात आशिष गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्यादी सुरेश विठ्ठलराव चन्ने (४६, रा. पोलिस लाईन टाकळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.आरोपीस अटक केली आहे

.——————————

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे