नागपूर/E T News
गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा च्यावतीने आणि संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासींचे अस्तित्व आणि अस्मिता टिकून राहण्यासाठी संपूर्ण जगामध्ये ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याच जाहीर केल आहे.
त्या अनुषंगाने भारतातही दरवर्षीप्रमाणे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन आदिवासी संस्कृतीमध्ये आदिवासी नृत्य कला पथकांच्या माध्यमातून आदिवासी वेशभूषेत साजरा केला जातो. त्या दिवशी सर्व आदिवासी समाज एकजुटीने एकत्र येऊन हा आदिवासी दिवस सण म्हणून साजरा करतात. त्यामुळे गडचिरोली पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यांना शासकीय सुट्टी असते. म्हणून नागपूर शहराला सुद्धा गोंड राजे बक्त बुलंदशाह यांचा इतिहास लाभला असल्यामुळे आपला जिल्हा सुद्धा आदिवासीबद्दल जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्याला सुद्धा जागतिक आदिवासी दिनानिमित्त येत्या ९ ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी घोषित करण्यात यावी. असे मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याप्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष राजेश ईरपाते यांचे नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित राष्ट्रीय महासचिव सुनीताताई उइके, विठ्ठलराव उईके, आशिष पेंदाम, सौरभ इंगळे, रितीक शेंडे यांची उपस्थिती होती.