” इंडियन मीडिया जर्नलिस्ट युनियन ” ची शाखा नागपुरात कार्यान्वित
” इंडियन मीडिया जर्नलिस्ट युनियन ” ची शाखा नागपुरात कार्यान्वित
पत्रकारांसाठी सदस्य नोंदणी सुरू
नागपूर/E T News
पत्रकारांची राष्ट्रीय संघटना ” इंडियन मीडिया जर्नलिस्ट युनियन “ची सभा महाराष्ट्र प्रदेशच्या सदस्य तथा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच धनवटे चेंबर्स, नेताजी मार्केट, सीताबर्डी येथे प्रदेश सरचिटणीस विनोद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
“इंडियन मीडिया जर्नलिस्ट युनियन” गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहे. युनियनचे संस्थापक श्री. बालाभास्करजी यांनी १९५० मध्ये के. रामराव यांनी स्थापन केलेल्या इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टमध्ये काम सुरू केले. तेथे बरीच वर्षे काम केल्यानंतर श्री बालाभास्करजींनी २०१० मध्ये ” इंडियन मीडिया जर्नलिस्ट युनियन ” ची स्थापना केली. महाराष्ट्र राज्यातही गेल्या अनेक वर्षांपासून या संघटनेचे काम सुरू आहे. याच श्रृंखलेत
नागपूर शाखेचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. लवकरच येत्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष मा. बालाभास्करजी यांच्या उपस्थितीत नागपूर शाखा कार्यालयाचे उद् घाटन होणार आहे. या बैठकीला भारतीय मीडियाचे प्रदेशाध्यक्ष संतोष सिंग लांजेवार, प्रदेश सरचिटणीस विनोद मेश्राम, नागपूर जिल्हाध्यक्ष लालसिंग ठाकूर, विजय खवसे, भीमराव लोणारे, टिळकचंद टेंभुर्णे, अशोक माटे, कोमल कुमेरिया आदी उपस्थित होते.
———————-