आरोपीने पोटात खुपसलेल्या चाकूसह जखमी अवस्थेत पोहोचला रुग्णालयात
दोन युवकांवर चाकूहल्ला, दोघेही गंभीर जखमी
आरोपीने पोटात खुपसलेल्या चाकूसह जखमी अवस्थेत पोहोचला रुग्णालयात
दोन युवकांवर चाकूहल्ला, दोघेही गंभीर जखमी
अमरावती/E T News
राजापेठ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आदिवासी हॉस्टलजवळ दोन युवकावर अज्ञातांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास चाकूहल्ला केल्यामुळे दोघेही यामध्ये गंभीर जमखी झाले आहे. विशेष म्हणजे एका युवकाच्या पोटात चाकू असतांनाच त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्याला पाहण्यासाठी रुग्णालयात मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
पेरम मोतीलाल यादव, वय १८, राहणार पार्वती नगर , हिमांशू पुंडलीक धांडे, वय १८, राहणार गडगडेश्वर हे दोघेही गुरूपोर्णिमेनिमित्त शेगाव येथे जात असतांना आदिवासी हॉस्टेल येथे अज्ञात युवकांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. ज्यामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. प्रेम यादव याच्या पोटात चाकू लागला असुन त्याच्या मित्राने त्याला त्याच अवस्थेत राजापेठ पोलिस स्टेशन येथे नेले. त्यानंतर पोलिसानी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही प्रेमच्या पोटात तब्बल १ तासपर्यंत चाकु तसाच दिसून आला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला पाहण्याकरीता मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणातील आरोपी अदयापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.