Breaking
ब्रेकिंग

माजी आमदार संजय धोटे व सुदर्शन निमकर यांचा बंडाचा झेंडा

0 1 8 5 2 1

* माजी आमदार संजय धोटे व सुदर्शन निमकर यांचा बंडाचा झेंडा

* राजुरा विधानसभेतून लोकाग्रहास्तव भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना लढविण्याचा निर्धार

* देेवराव भोंगळे आयात केलेले उमेदवार

( रंगराव कुळसंगे : चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी )

राजुरा/E T news 

               राजुरा विधानसभा क्षेत्रातून आयात केलेले उमेदवार आणि लोकसभेच्या तयारीसाठी आलेल्या देवराव भोंगळे यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले असून हे येथील स्थानिक कार्यकर्त्यांना अजिबात मान्य नाही. या क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे कार्य नसतांना गेल्या चाळीस वर्षापासून पक्षात कार्य करणा-या कार्यकर्त्यांचा अपमान झाला असून पात्र व योग्य उमेदवारांना डावलण्यात आले आहे. आता आम्ही शांत बसणार नसून पक्ष श्रेष्ठींपुढे गा-हाणे मांडणार आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विधानसभा निवडणूकीत अर्ज दाखल करणार असून त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे माजी आमदार अॅड. संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

              यावेळी एड.संजय धोटे यांनी सांगितले की, देवराव भोंगळे यांना केवळ लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी पाठविले होते, मात्र त्यांनी येथे येऊन काही कार्यक्रम आयोजित करून दावेदारी केली. त्यांचा येथील कार्यकर्त्यांशी संपर्क नसून स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना त्यांनी कधीही सन्मान दिला नाही. वास्तविक ते आयात केलेले नेते असून आम्हाला ते मान्य नाही, असे एकाच सुरात सर्व भाजप नेत्यांनी सांगितले.

          पत्रकार परिषदेला माजी आमदार एड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजप राज्य कार्यकारणी सदस्य खुशाल बोंडे, राष्ट्रवादी काॅग्रेस अजीत पवार गटाचे नेते आबीद अली, अरूण म्हस्की, सुरेश केंद्रे, निलेश ताजणे आदींसह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेनंतर राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते एकत्र आले आणि घोषणा देऊन भाजपच्या निर्णयाचा निषेध नोंदवित जोरदार घोषणा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे