पाच लाखांच्या एमडी प्रकरणातील आरोपीला अटक – गुन्हे शाखेची कारवाई : घरातून घेतले ताब्यात (दि. ०२)
पाच लाखांच्या एमडी प्रकरणातील आरोपीला अटक – गुन्हे शाखेची कारवाई : घरातून घेतले ताब्यात
नागपूर/E T News
बिडीपेठ येथे टाकलेल्या धाडीत गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने ५ लाख ८ हजार १०० रुपयांच्या एमडी ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली होती. त्याला ड्रग्ज विक्र ीसाठी देणा-या एका आरोपींच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ईस्तीयाक हुसैन व वसीम उर्फ गुड्डू (रा. मोठा ताजबाग) असे आरोपीचे नाव आहे. तर, ईकबाल शेख तय्यब शेख (४०, रा. जुना बिडीपेठ) याला आधीच अटक करण्यात आली होती.
सक्करदरा ठाण्यांतर्गत पेट्रोलिंगवेळी ८ मे रोजी, मध्यरात्रीनंतर २.३० वाजताच्या सुमारास जुना बिडीपेठ येथील बुध्द विहारच्या मागे टाकलेल्या धाडीत पोलिसांना ईकबाल शेख तय्यब शेख दिसून आला. अंमलीपदार्थ विक्रीचे त्याच्यावर पूर्वीच तीन गुन्हे असल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. परिणामी, ताब्यात पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ५ लाख ८ हजार १०० रुपयांचे ५०.८१ ग्रॅम एम.डी पावडर सापडले. त्याची सखोल विचापूस केली असता ईकबालने उपरोक्त ड्रग्ज ईस्तीयाक आणि वसीम याच्या मदतीने मिळवल्याचे सांगितले. तेव्हा पासून हे दोघेही आरोपी पोलिसांच्या रडावर होते. पोलिसांनी ईकबालवर गुन्हा दाखल करत अटक केल्यानंतर तपासाची सुत्रे जोमाने हलविली. मिळालेल्या माहितीचा तांत्रिक तपास केल्यानंतर पोलिसांनी ईस्तीयाक हुसैन याला त्याच्या घरातून अटक केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी सक्करदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
———————————–