पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिवस संपन्न
पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिवस संपन्न
कामठी/E T News
५ सप्टेंबर हा भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कामठी येथील पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनय चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल पर्यवेक्षक प्राध्यापक विश्वनाथ वंजारी तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. किरण पेठे मंचावर उपस्थित होत्या. शिक्षक दिनाचे औचित्य साधून याप्रसंगी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये विद्यान विभागातून अब्दुल रहेमान, वैभवी अग्निहोत्री बिस्मा महरीन, तर वाणिज्य आयमन फा, आदित्य शुक्ला मोहिनी गुप्ता कला शाखेच्या विभागातून वेदिका खंगार, निधी साहू मिरजला गजभिये या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनेश चव्हाण यांनी याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
प्रमुख वक्त्या डॉ.कुमारी किरण पेठे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करून विद्यार्थ्यांना कौशल्य युक्त व रोजगार युक्त शिक्षण देण्याची गरज प्रतिपादन केले तसेच नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या कृतिशिलतेवर ,शिक्षकांच्या गुणवत्तेवर भर देण्यात आल्याचे सांगितले.
पर्यवेक्षक प्रा व्हि.बी वंजारी यांनी शिक्षकांची भूमिका व विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीवर चिंता व्यक्त केली व प्रचलित शिक्षण पद्धती या दोषांवर भाष्य केले.तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या एक शैक्षणिक संकटं असून शेतकऱ्यांच्या आत्महत्ये पेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी आत्महत्या करत असल्याची चिंता व्यक्त करून या समस्येकडे शिक्षकांनी,पालकांनी ,
सरकारने व शिक्षण विभागाने गांभीर्याने विचार करण्याची व विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. केले. कार्यक्रमाचे संचालक प्राध्यापिका सोनल मालवीय यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सौरभ बनसोड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणण्यात प्राध्यापक पंकज वाटकर मोहिनी यादव, प्राध्यापक नागपुरे त्यांनी बोलायचे सहकार्य केले.