Breaking
ब्रेकिंग

शेडवाही येथील सरपंचासह काॅग्रेस व भाजप कार्यकर्ते शेतकरी संघटनेत 

0 1 8 5 2 1

शेडवाही येथील सरपंचासह काॅग्रेस व भाजप कार्यकर्ते शेतकरी संघटनेत 

जीवती तालुक्यात शेतकरी संघटनेची जोरदार मुसंडी

  • राजुरा/E T News (प्रतिनिधी – रंगराव कुळसंगे)
  •       राजुरा विधानसभा क्षेत्रातील जीवती तालुक्यातील शेडवाही या आदिवासी व अतिदुर्गम ग्रामपंचायत चे काॅग्रेस पक्षाचे सरपंच सित्रूजी सिडाम यांचेसह काॅग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला रामराम करीत शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे संघटनेचा लाल बिल्ला लावून माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी स्वागत केले. यावेळी शेडवाही चे सरपंच सित्रू पाटील सिडाम यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. शेडवाही गुड्यावरील समाजमंदिरात झालेल्या या बैठकीला माजी जि.प. सभापती निळकंठराव कोरांगे, शेख इस्माईल, मधुकर चिंचोलकर, शब्बीर जागीरदार, यांचेसह जीवती तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
  •               या बैठकीत बोलतांना सरपंच सित्रूजी सिडाम म्हणाले की, गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात काॅग्रेस प्रणित आघाडी व सध्या भाजपप्रणित युती सरकार सत्तेत आहे. मात्र या दोन्ही युती – आघाडी च्या सरकारने शेतमालाच्या रास्त किंमत देण्याचे बाबतीत शेतकऱ्यांवर अन्याय केला. आमच्या आदिवासी भागात विकासकामांना प्राधान्य दिले नाही आणि याबाबत स्थानिक नेतृत्वाने आवाज उठविला नाही. त्यामुळे आता विधानसभेत ॲड. वामनराव चटप यांच्यासारख्या शेतकरी नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही सामूहिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवून शेतकरी संघटनेत प्रवेश केल्याचे सरपंच सित्रू सिडाम यांनी बोलतांना सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन त्यांच्या विचारांना सहमती दर्शवली.
  •             या सभेत शेडवाही येथील आमू पाटील सिडाम, हनुमंतू कन्नाके, बारीकराव गेडाम, माणिक सिडाम, माणिक कोहचाळे, चंदू सिडाम, मोतीराम सिडाम, मोतीराम आत्राम, मारोती उदे, बंडू कोडापे, राजू सिडाम, अमृत सोयाम, भिमराव उदे, रामू कुमरे, आनंद परचाके, मोतीराम सिडाम, देवराव गेडाम, भिमराव आत्राम, सोमू कन्नाके, गणपती कुमरे, संभाजी सिडाम यांचेसह अनेक काॅग्रेस व भाजप कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
1/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे