Breaking
ब्रेकिंग

मैत्रीचे आरंभ इंद्रधनू चित्रप्रदर्शन -2025 शुक्रवारपासून दर्डा आर्ट गॅलरीत 

0 1 8 5 2 1

मैत्रीचे आरंभ इंद्रधनू चित्रप्रदर्शन -2025 शुक्रवारपासून दर्डा आर्ट गॅलरीत 

नागपूर/ विशेष प्रतिनिधी

३४ वर्षांपूर्वी सहा वर्षे एकत्रित कला अध्ययन केलेल्या व आज वेगवेगळ्या व्यवसायात असलेल्या जिवलग मित्रांनी पुन्हा मैत्र धागा विणत इंद्रधनु आर्टिस्ट ग्रुप स्थापन करून पहिले आरंभ २०२५ हे चित्र प्रदर्शन जवाहरलाल दर्डा कलादालन, नागपूर या प्रसिद्ध गॅलरीत भरवत आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण मध्य क्षेत्रिय सांस्कृतिक केंद्र, नागपूर च्या संचालक श्रीमती आस्था कार्लेकर यांच्या शुभहस्ते ३१ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी संध्याकाळी ५ वाजता होत आहे. यावेळी सर जे.जे. स्कूल आर्ट, मुंबई या जगप्रसिद्ध कला महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता, महाराष्ट्र राज्याचे माजी कला संचालक व सध्या नागपूरच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे आणि उच्च न्यायालय, नागपूर येथील जेष्ठ विधीज्ञ आनंद परचुरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या चित्रप्रदर्शनात अनघा साल्पेकर, अरविंद घोरपडे, अशोक पारधी, दामोदर आर्वीकर, घनश्याम देशमुख (पुणे), नाना मिसाळ, प्रशांत हरदास (सातारा), राजेंद्र भुते, राजेंद्र महाजन (जळगाव) राजेंद्र साकल्ले, स्वाती गोडबोले (पुणे), श्रीकांत वेखंडे, विजय जायस्वाल अशा १३ सहाध्यायी मित्रांची वेगवेगळ्या धाटणीची चित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहे. “ह्युमन इलस्ट्रेशन” या विषयावर प्रसिद्ध व्यंगचित्रकार “बोलक्या रेषा कार घनश्याम देशमुख व प्रसिद्ध कला दिग्दर्शक नाना मिसाळ यांचे कला प्रात्यक्षिक हे या चित्रप्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. यात अमूर्त चित्र, निसर्ग चित्र, व्यक्तिचित्र, स्थिरचित्र, सृजन रचना चित्र, ड्रॉईग्ज् अशी वेगवेगळे विषय व माध्यमातील चित्रे आहेत. कला विद्यार्थी असतांना या मित्रांची “पॅलेट-८८’ नावाची दोन चित्रप्रदर्शन माहिती केंद्र, सिताबर्डी, नागपूर येथे झालेली आहेत.

या चित्रकारांना अरुण भापकर, नंदकिशोर मानकर, अरुण दारोकर, डि. बी. बेळे, प्रमोद बाबू रामटेके, अधिष्ठाता अरविंद मोरे, श्रीकृष्ण साऊरकर, धनंजय वर्मा, वामन चिंचोळकर, आप्पासाहेब काटे, सुषमा बुचे, वर्षा रेगे, उत्तरा हुद्दार, रजनी कोलारकर, डॉ. श्रीकांत दाभाडे, सुनीता क्षोत्रिय, दीपक जोशी, डॉ. विनोद इंदुरकर, डॉ. सुनिल सुभेदार अशा अनेक दिग्गज प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले होते. इ.स.१९८९ च्या पॅलेट-८८ चित्रप्रदर्शनाचे उ‌द्घाटन प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप-१९४७ चे प्रसिद्ध चित्रकार एच.ए. गाडे यांनी केले होते.

या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र साकल्ले, नाना मिसाळ, दामोदर आर्वीकर, श्रीकांत वेखंडे, विजय जायस्वाल, राजेंद्र भुते, अरविंद घोरपडे, अनघा सालपेकर हे स्थानिक चित्रकार प्रयत्न करीत आहेत. हे चित्रप्रदर्शन दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. या चित्रप्रदर्शनाच्या आस्वादासाठी आम्ही सारे मित्र आपली उत्सुकतेने वाटबघत आहोत.

—————

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे