नवनित विद्यालय खमारी (बुज.) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम

नवनित विद्यालय खमारी (बुज.) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम
मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशिय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा द्वारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) या शाळेत दि. ३ जानेवारी २०२५ ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती बालिका दिन, महिला शिक्षण दिन म्हणून हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस समिक्षा उपराडे व मानसी पंजरे या विद्यार्थ्यांनीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.
सावित्रीबाई फुले या भारतातील समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, कवयित्री तसेच प्रथम महिला शिक्षिका होत्या. त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समिक्षा उपराडे तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे विश्वस्त हिरालाल गजभिये, मुख्याध्यापक नरेंद्र गणविर, सुनिल नागदिवे, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. अरुण कांबळे, प्रा. नानाजी गजभिये, सुमिता गजभिये, निर्मला रंगारी, अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये, संजीव मेश्राम हे उपस्थित होते. याप्रसंगी भाषण, गीतगायन, वेशभूषा व नृत्य या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये अस्मिता खैरे, रिंकू हरदे, जान्हवी हरदे, आचल शहारे, अक्षरा उपराडे, आरुषी बंधाटे, सुनेरी हरदे, मोहिनी दमाहे, श्रावणी मेश्राम, सानिया मेश्राम, शितल दमाहे, वंशिका उपराडे, आचल बांते, अल्फिया पठाण, नेहती माहुले यांनी सहभाग घेतला. सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील सर्व विद्यार्थ्यांनीचे गुलाब पुष्प देवून स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन जयश्री दमाहे तर आभार प्रदर्शन आवेश देवगडे यांनी केले.