‘एक कॅडेट एक पेड ‘ व ‘ एक पेड माँ के नाम ‘ या मोहिमे अंतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम
‘एक कॅडेट एक पेड ‘ व ‘ एक पेड मां के नाम ‘ या मोहिमे अंतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम
नागपूर/E T News
दिनांक 01/08/2024 ला 3 महाराष्ट्र इजि.कंपनी एन.सी.सी. नागपूर अंतर्गत मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन एनसीसी विभागातर्फे ‘ एक कॅडेट एक पेड ‘ व ‘ एक पेड मा के नाम ‘ या मोहिमे अंतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांतर्गत एन.सी.सी. विभागातर्फे रोपट्याचे वितरण करण्यात आले रॅली काढून वृक्ष संवर्धनाचा संदेश देऊन वृक्ष संवर्धनासाठी समाज जागृती करण्यात आली
शाळेतील मुख्याध्यापिका सौ. शीला मुडे एन.सी.सी. अधिकारी अमित मुदगल व संजीवनी झाडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले
या कार्यक्रमास 100 एन.सी.सी .कॅडेट द्वारा कडुलिंब, पिंपळ, निलगिरी, जांभूळ इत्यादी रोपांचे रोपण करण्यात आले कार्यक्रमास आय .सी .ओ. दिलीप नगारे, सी. एन .एम .संजय कबाडगे, एनव्ही विजय वाघमारे उपस्थित होते कमांडिंग ऑफिसर कर्नल सी .एन.सोळंकी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला.
—-+——–