राज्य सरकारने स्वतंत्र ग्राहक मंत्रालयाची स्थापना करावी : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या विदर्भ प्रांतची मागणी

राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष
राज्य सरकारने स्वतंत्र ग्राहक मंत्रालयाची स्थापना करावी
ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या विदर्भ प्रांतची मागणी
नागपूर/प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने स्वतंत्र ग्राहक मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या विदर्भ प्रांतने राज्य सरकारला केली आहे.
२४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन असून, प्रशासकीय स्तरावर हा दिवस ग्राहक जागृती सप्ताह म्हणून साजरा करावा आणि त्यानिमित्त स्वतंत्र ग्राहक मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय आणि विदर्भ प्रांत सचिव लीलाधर लोहरे यांनी केली आहे.
ग्राहक समस्या निवारण्यासाठी
ग्राहक सप्ताहाद्वारे मोठ्या प्रमाणात ग्राहक जागृती आवश्यक आहे. याशिवाय, ग्राहक आयोगातील हजारो प्रकरणे प्रलंबित असून, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांच्या बैठकात अनियमितता असणे, तसेच ग्राहक समस्या निवारणासाठी निर्मित व्यवस्थेत आलेली शिथिलता दूर करण्यासाठी स्वतंत्र ग्राहक संरक्षण मंत्रालय तसेच राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे पुनर्गठन अत्यावश्यक झाले आहे, याकडे सरकारने जातीने लक्ष द्यावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रने केले आहे.
—————-