पवित्र दीक्षाभूमीवर बुद्धांच्या अस्थिंचे आगमन आज शहरातील उपासक -उपासिकांनी अस्थिचे दर्शन घ्यावे : भदंत हर्षबोधी

पवित्र दीक्षाभूमीवर बुद्धांच्या अस्थिंचे आगमन
नागपूर शहरातील उपासक -उपासिकांनी अस्थिचे दर्शन घ्यावे : भदंत हर्षबोधी
नागपूर/प्रतिनिधी
दिल्ली वरून येत असलेली बुद्धांची अस्थि 6 फेब्रुवारीला नागपुरात दीक्षाभूमी येथे दुपारी ३ ते ६ या दरम्यान येत आहे तसेच दीक्षाभूमी येथे ठेवण्यात येत आहे. शहरातील उपासक-उपासिकांनी अस्थिच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भदंत हर्षबोधी यांनी पत्रपरिषदेत केले.
शहरातील बौद्ध बांधवांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून अस्थि दर्शनास यावे. असे आवाहन भदंत हर्षबोधी यांनी केले आहे. या विषयाला धरून दीक्षाभूमी स्मारक समितीकडून अस्थि ठेवण्यासाठी अनुमती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला उपस्थितीत भैय्यासाहेब खैरकर, संजय मून, भदंत चंद्रबोधी, भदंत एस राहुल, नरेश गायकवाड, अनिल कोंडमारे आदींची उपस्थिती होती.