नवनित विद्यालयात शिक्षक दिन साजरा*
*नवनित विद्यालयात शिक्षक दिन साजरा*
भंडारा/E T News
मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा व्दारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा या शाळेत दि. ५/९/२०२४ ला स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्त शिक्षक दिनाचा कार्यक्रम स्वयंशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेत भाषण, वैयक्तिक व सामुहिक शिक्षक गौरव गीताचे गायन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शालेय प्रशासन व व्यवस्थापन कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जबाबदारी व कार्य विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट शिक्षिका म्हणून जयश्री दमाहे व अस्मिता खैरे या विद्यार्थीनीचे अभिनंदन करण्यात आले.
शालेय स्वयंशासन उपक्रमामध्ये मुख्याध्यापक म्हणून आयुष सव्वालाखे तर माध्यमिक सहा. शिक्षक म्हणून आवेश देवगडे, स्वेता सातक, अस्मिता खैरे, जयश्री दमाहे, खुशाली दमाहे, श्रेया खजुरे, आरुषी बंधाटे, वंशिका गयगये, सानिया मेश्राम, रिंकु हरदे, आचल शहारे, आचल बांते, आचल दमाहे, अल्फिया पठाण, समिक्षा उपराडे, शेजल पाटील, मानषी पंजरे तर उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून सागर दमाहे, प्रिन्सी कस्तुरे, गुड्डीया तांदूळकर, अपुर्वा दमाहे, शेजल शहारे, स्वाती हरदे, दिव्यांनी बिरणवार, भाग्यश्री दमाहे, राणी पाटील, महेश्वरी बंधाटे, कशिश बंधाटे, समिक्षा फोफसकर, राणी हरदे, रूचिता दमाहे या विद्यार्थ्यांनी शाळेत अध्यापनाचे कार्य शालेय वेळापत्रकानुसार पार पाडले. शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून अभिषेक दमाहे, सत्यम चौधरी, क्रिश लक्षणे, प्रणय उपराडे, प्रणय बंधाटे यांनी कार्य पार पाडले.
यावेळी संस्था सचिव हिरालाल गजभिये, शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र गणविर, निर्मला रंगारी, सुमिता गजभिये, सुनिल नागदिवे, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. नानाजी गजभिये, शिक्षकेतर कर्मचारी अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री दमाहे या विद्यार्थ्यांनींने केले.