संविधान दिनी ” मरणोत्तर देहदान व मेंदूमृत अवस्थेत गरजवंतांना अवयवदान करण्याचा संकल्प

संविधान दिनी ” मरणोत्तर देहदान व मेंदूमृत अवस्थेत गरजवंतांना अवयवदान करण्याचा संकल्प
नागपूर/प्रतिनिधी
के. वाय.गोल्ड कंपनीचे संचालक श्री. अरविंद पराते साहेब, इंदूताई मेमोरियल हायस्कूलचे शिक्षक श्री. दिनेश सुखदेवे आणि श्री.आशिष हाडके यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत संविधान दिनी ” मरणोत्तर देहदान व मेंदूमृत अवस्थेत गरजवंतांना अवयवदान करण्याचे संकल्प पत्र मेडिकल येथील देहदान समितीचे सन्माननीय सदस्य प्रा.डॉ.सुशील मेश्राम यांचे कडे भरून दिले.
भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, भगिनीतव व बंधुत्व, धर्म निरपेक्षता ही महान जिवनवादी मूल्ये भारतीय नागरिकांना दिलीत.सर्वांगसुंदर भारतीय समाज निर्माण व्हावा म्हणून ही जीवनमूल्ये भारतीय नागरिकांनी ती स्वतःच स्वतः प्रत अर्पण केलेली आहेत.
अवयवदान, देहदान करू इच्छिणारी व्यक्ती सर्व भारतीयांकडे किंबहुना जगातील नागरिकांकडे न्याय, समता व बंधुत्वाचया दृष्टिकोनातून बघते.हा दानदाता कोणतीच परतफेडीची इच्छा मनात न ठेवता धर्म निरपेक्ष भावनेने आपला देह आपल्या मृत्यूनंतरही कोणाच्या तरी कामी येत असेल तर या मृतदेहाला लाकडांवर जाळून मातीमोल न करता देहदान, अवयवदान करून बहुमोल करावा असा परोपकारी विचार करतो.
भारतीय संविधान भारतीय नागरिकांकडून हीच माफक अपेक्षा करते.ही गोष्ट डाॅ.सुशील मेश्राम यांचेकडून या देशभक्त तरुणांनी समजावून घेतली व संविधान दिनी आपले मरणोत्तर देहदान-अवयवदान संकल्प पत्र आपल्या कुटुंबियांसमवेत भरून दिले. आम्ही आमच्या पुरतेतरी संवैधानिक मूल्ये कृतिशील केलीत यांचे समाधान यांचे चेहऱ्यावर झळकत होते.
संविधान व अवयवदान, देहदान जागराचा एक सर्व हितकारक उपक्रम या निमित्ताने समाज पटलावर दाखल झाला म्हणून नागरिक या नव्या आधुनिक उपक्रमाचे कौतुक करीत आहेत.