लॉर्ड बुद्धा TV आयोजित धम्म संकल्प अभियानाचा शुभारंभ रविवारी २१ रोजी
आषाढ पौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
लॉर्ड बुद्धा TV आयोजित धम्म संकल्प अभियानाचा शुभारंभ रविवारी २१ रोजी
आषाढ पौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर/E T News
षाढ़ी पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धाने पांच भिक्खुंना आपला पहिला उपदेश मिगदाय वन, सारनाथ येथे दिला होता, ज्याला आपण *धम्मचक्कप्पवत्तनसुत्त* म्हणतो.
पांच भिक्खुंनी बुद्धाचे शिष्यतत्व स्विकारल्यानंतर तथागत बुद्धांनी संघ स्थापन केला. बुद्धाने धम्मचक्कप्पवत्तन संगितल्यानंतर सारनाथ आणि आसपासच्या घटनांचे चक्र खुप वेगाने घड़ले आणि पहिल्या वर्षाच्या शेवटी भिखु संघातील भिक्षुंची संख्या 60 वर पोहोचली.
राजे महाराजे, गरीब आणि दुर्बल घटक, श्रेष्ठ आणि खालच्या जातीचे लोक बुद्धाच्या राजवटीत जास्त प्रमाणात येऊ लागले.
आपल्या ज्ञानाने बुद्धाने त्याकाळातील ब्राम्हण, भंगी, प्रकृति चांडाळ, सोपक, सुप्पीय आणि उपाली नाई यांना धम्मात दीक्षा दिली आणि जाती व्यवस्था नष्ट करण्याचा मार्ग मोकळा केला.
भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांच्या 80 वर्षाच्या आयुष्यात 45 वर्षावास पूर्ण केले.
वर्षावासाच्या निमित्याने आषाढ़ पूर्णिमा पासून अश्विन पौर्णिमे पर्यंत लॉर्ड बुद्धा टिवी ने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 36 कार्यशील बुद्ध विहारात पांच प्रमुख भिक्षुंणा सोबत घेऊन धम्मदेसना आणि चिवरदान कार्यक्रम आयोजन करण्याचा प्रयत्न करित आहे.
धम्म संकल्प अभियानाच्या माध्यमातून तीन महीने महाराष्ट्रातील वातावरण धम्ममय करण्याचा हा छोटासा प्रयत्न लॉर्ड बुद्धा टिवी करित आहे.
हा धम्मसंकल्प अभियान संपूर्ण महाराष्ट्रातुन Live थेट प्रक्षेपण आमच्या 22 राज्यातील प्रेक्षकांना घरबसल्या आपल्या केबल टिवी वर, मोबाइल वर आणि एंड्रॉइड टिवी वर निःशुल्क पाहता येणार आहे.
या धम्मसंकल्प अभियानाचा उदघाटन समारंभ रविवार 21 जुलै 2024 आषाढ़ पौर्णिमेच्या दिवशी बौध्दगया येथील भदंत हर्षबोधी यांच्या हस्ते करण्याचे ठरविले आहे. या करिता आपली उपस्थिति प्रार्थनीय आहे, असे आवाहन Lord Buddha TV चे संचालक सचिन मून यांनी केले आहे.
*रविवार 21 जुलै 2024 सकाळी 11.30 वाजता*
*स्थान – होटेल तायबा, इमामवाड़ा पोलीस स्टेशन के सामने, ग्रेट नाग रोड, नागपुर