पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न
पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न
कामठी/ E T News
कामठी येथील पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न दिनांक ९/८/२०२५ रोजी संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सुधीर अग्रवाल उपाध्यक्ष म्हणून पालक संवर्गातून डॉ..सचिन इखार तर सहसचिव म्हणून प्रा. डॉ.. लता अग्रवाल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.विश्वनाथ वंजारी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता कनिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर शिक्षक कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली. शिक्षक पालक समितीच्या उपाध्यक्षपदी डॉ सचिन इखाऱ तर सहसचिवपदी डॉ.जिवनलता अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षक पालक सभेचे प्रास्ताविक प्राध्यापक पंकज वाटकर यांनी केले. शिक्षक पालक शुभेचे उपाध्यक्ष डॉ. सचिन इखार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सांगितला तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी शिस्त राखावे. विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावे असे प्रतिपादन केले. तर डॉ. जीवनगाथा अग्रवाल यांनी पोरवाल कनिष्ठ ग्रामीण भागातील एक नामांकित महाविद्यालय असून विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले. पर्यवेक्षक प्राध्यापक विश्वनाथ वंजारी यांनी महाविद्यालयीन परिसरात शिस्त राखण्याची ग्वाही दिली.तर उपप्राचार्य डॉक्टर सुधीर अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून
पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. तसेच शिक्षण प्रक्रियेतील शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी जबाबदारीने वागावे प्रतिपादन केले.
पालकांच्या काही अडचणी असतील तर निश्चित सांगाव्या असं आवर्जून पालकांना देखील सांगितले व शिक्षकांकडून शैक्षणिक विकासाबरोबर आनंददायी शिक्षण घडावे या अपेक्षा व्यक्त केल्या.पालक प्रतीनिधी म्हणून चैतराम कोसेकर प्राध्यापक मनोज सपाटे, व प्रा पंकज गौरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या निमित्ताने पालक शिक्षक संघाची कार्यकारणी घोषित करण्यात आली. शिक्षक विद्यार्थी पालक सभेला चैतराम कोसेकर, विनोद भोंडेकर, अजय राऊत, रोशन महतो, मुसरत वकील, सुनील जाधव ,गजानन तुळशीकर ,बादल धुर्वे, माया गभणे ,स्वाती कोठेकर आदी पालक, बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक पंकज वाटकर यांनी केले.