पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींची सुरक्षितता या विषयावर कार्यशाळा संपन्न
पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींची सुरक्षितता या विषयावर कार्यशाळा संपन्न
कामठी येथील पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींची कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेत सखी सावित्री समितीचे समुपदेशक डॉ निता वानखेडे,महिला शिक्षक प्रतिनिधी डॉ कुमारी किरण पेठे,पालक प्रतिनिधी प्रा किरण पुडके व ,विद्यार्थी प्रतिनिधी अर्पित बोरकर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा व्हि बी वंजारी होते.
कार्यक्रमाचे संचालन राधा अगरवाल, यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.वंजारी सर यांनी समितीच्या सदस्यांची नावे सांगून समितीची उद्दिष्ट्ये सांगितली, डॉ. पेठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक , प्रमुख वक्त्या प्रा. किरण पुडके यांनी स्त्रियांची पेहराव, वेशभूषा वातावरणाला कशी साजेशी असावी हे सांगितले, समुपदेशक डॉ.नीता वानखेडे यांनी विद्यार्थिनींनी शाळा महाविद्यालयात येताना सुरक्षितता कशी बाळगायची या विषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन राधा जिवनलता अग्रवाल या विद्यार्थिनीने केले आभार प्रा मोहिनी घाटे यांनी आभार व्यक्त केले.