Breaking
ब्रेकिंग

जुन्या वैमनस्यातून वृद्धाची हत्या : मोहगाव येथील घटना; आरोपीला अटक

0 1 8 5 2 1

जुन्या वैमनस्यातून वृद्धाची हत्या : मोहगाव येथील घटना; आरोपीला अटक

भंडारा/E T News

पोलिस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या मोहगाव (खदान) येथील एका ६० वर्षीय वृद्धाची जुन्या वैमनस्यातून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येतील आरोपीला सिहोरा पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येमुळे सिहोरा परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मृतक सत्यवान गायकवाड हा अंदाजे ६० वर्षे वयाचा असून घरी एकटाच राहत असल्याचे सांगितले जात आहे. त्याला दोन मुले असून ते बाहेरगावी राहतात. आज ४ आॅगष्ट रोजी सकाळी सत्यवान गायकवाड हा मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्याला जबर मार असून तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडला होता. घटनेचे वृत्त कळताच सिहोरा पोलिसांची चमू घटना स्थळावर दाखल झाली. श्वान पथकाच्या मदतीने तपासाची चक्रे पोलिसांनी वेगाने फिरवली असता आरोपी शैलेश उईके (३५) यास अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास सिहोरा पोलिस करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे