आमदार नितीन राऊत यांनी पुन्हा केली फसवणूक ! आवळे बाबू स्मारक बांधकाम प्रकरण
आमदार नितीन राऊत यांनी पुन्हा केली फसवणूक !
आवळे बाबू स्मारक बांधकाम प्रकरण
कर्मवीर हरिदास आवळे सामाजिक भवनाचे काम पूर्ण झाले नसतांना व भवनाच्या प्रांगणात आवळे बाबुंचा पुतळा उभारला नसतांना अर्धवट भवनाचे अनधिकृत व बेकायदेशीररित्या लपुनछपून उद् घाटन करुन कर्मविर आवळे बाबूंच्या श्रद्धास्थानाचा सार्वजनिकरित्या अवमान केला. ह्या कृत्यामुळे त्यांचे विरुध्द उसळलेला जनक्षोभ क्षमविण्याच्या दुष्ट हेतूने त्यांनी पुन्हा आंबेडकरी समाजाची फसवणूक केली आहे.
आमदार राऊत यांनी आमदार विकास निधीतून आवळे स्मृती परिसरातील सौंदर्यीकरणासाठी ८ लक्ष निधी मंजूर केला व त्याचे भूमिपूजन तृष्णामुक्त भंते नागदिपांकर यांचे हस्ते उरकून टाकले. आमदारानी हा निधी आपल्या संपूर्ण ५ वर्षाचा कार्यकाळात मंजूर कां केला नाही? नियोजित काम टेंडर काढून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कां पूर्ण केले नाही? असे अनेक प्रश्न आंबेडकरी जनता विचारीत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निकाल लागेपर्यंत कोणत्याही विकास कामाचे टेंडर काढता येत नाहीत, कामाचे आदेश निघत नाही. मग ह्या निधीतून विकासकामे कधी होणार? यांचे उत्तर ह्या आमदारांला उत्तरच्या जनतेनी मागीतले पाहिजे. आचारसंहिते पूर्वी ज्या कामाचे टेंडर निघाले नसल्यास निवडणूक आटोपल्यावर नवीन सरकार येते व ती प्रस्तावित कामे व म़ंजुरीत निधी laps होतो. यांची पूर्ण माहिती आमदारांना होती तरीही त्यांनी सदर निधीतून भूमिपूजन करुन टाकले. ही आंबेडकरी जनतेची शुध्द फसवणूक आहे. मात्र ह्या कामाचा दगड लावला नसल्याने आमदारानी स्वतः ह्या कामाचे भूमिपूजन करण्याचे पध्दतशीरपणे टाळले. या फसवणूकीबाबत आंबेडकरी जनतेनी टीका करू नये म्हणून बौद्ध भिक्षूच्या हस्ते भूमिपूजन उरकून टाकले.भंते संघ रत्न माणके यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे . या चांडाळ चौकडीत त्यांनी बसू नये.
कमाल चौकातील आवळेंचा पुतळा व परिसर उमेश बोरकर नावाच्या इसमाला ठेक्यावर दिला. हा उमेश बोरकर कोण? हा आहे उत्तर नागपूर मनसेचा अध्यक्ष. त्याचा आवळे बाबुच्या मिशनशी काडीचाही संबंध नाही. आवळे बाबुच्या कोणत्याही निष्ठावान कार्यकर्त्यांना ही जबाबदारी महानगर पालिकेने कां दिली नाही हाही संशोधनाचा विषय आहे. येणाऱ्या निवडणुकीत आमदारासाठी अनेकांनी काम करावे यासाठी खुप अंतर्गत वाटाघाटी झाल्या व ह्या वाटाघाटीत वाटा मिळाला भंते नागदिपांकर यांना. भंतेजीला आवळेबाबुचे सामाजिक भवन मिळाले. सदर भवनाच्या उद्घाटनाच्या बॅनरवर भंते नागदिपांकर यांचा आवळे बाजुच्या फोटोसमोर मोठा फोटो रंगविला होता. हया भवनाच्या निधी संकलनाची जबाबदारी आमदारप्रिय सुरेश पाटील यांना मिळाली. उमेश बोरकरला आवळेचा पुतळा मिळाला व अशोक कोल्हटकरला राजाभाऊंचा जन्मशताब्दी महोत्सव व बॅरिस्टर खोब्रागडे ट्रस्ट साठी फंड देण्याचं आश्वासन मिळालं. काही रिपाइं गटनेत्यांना त्यांच्या एपतिनुसार किमत मिळते. सर्वच अशाप्रकारे रिपब्लिकन मतांची सौदेबाजी करतील तर मग रिपब्लिकन अस्मिता व स्वाभिमानाचं काय?
आदी प्रश्न हे उत्तर नागपूरच्या निवडणुकीत अनुत्तरितच राहतील काय? हेही एक कोडेच आहे! न सुटलेले अन् न सुटणारे?
विनायकराव जयवंतराव जामगडे ७८२३०९३५५६९ ३७२४५६३८९