* अभिजीत टेकाम यांना विदेशात शिक्षणासाठी 52 लाखाची शिष्यवृत्ती

* अभिजीत टेकाम यांना विदेशात शिक्षणासाठी 52 लाखाची शिष्यवृत्ती
* ॲड. वामनराव चटप यांनी घरी जाऊन केला सत्कार
(राजुरा तालुका प्रतिनिधी रंगराव कुळसंगे)
राजुरा – राजुरा येथील अभिजीत मधुकर टेकाम यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शासनातर्फे 52 लाख 74 हजार रुपयांची (47450 पाऊंड) शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. इंग्लंड च्या युनिर्व्हरसिटी ऑफ शिफिल्ड मधून मास्टर ऑफ साइन्स इन बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्व्हेशन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याने ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन टेकाम परिवाराचा सत्कार केला.
आता आदिवासी समाज शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करीत असून ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचे मत माजी आमदार वामनराव चटप यांनी व्यक्त केले. या सत्कार प्रसंगी चंद्रपूर जि.प. समाजकल्याण माजी सभापती निळकंठ कोरांगे, ॲड.श्रीनिवास मुसळे, शेषराव बोंडे, रमेश नळे, बंडू देठे, प्रभाकर ढवस, देठे, मधुकर चिंचोलकर, कपील इद्दे, रत्नाकर चटप, मधुकर टेकाम व सौ. टेकाम उपस्थित होते.