Breaking
ब्रेकिंग

आंबेडकरवादी पक्षाच्या एकीकरणाला विरोध करणाऱ्या आंबेडकरी नेत्याच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा

0 1 8 5 2 1

आंबेडकरवादी पक्षाच्या एकीकरणाला विरोध करणाऱ्या आंबेडकरी नेत्याच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा : चंद्रशेखर टेंभुर्णे

*आंबेडकर वादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य अध्यक्ष यांची संयुक्त बैठक मुंबई येथे दि. १७/०८/२०२४ रोजी 

नागपूर/E T News

राज्यात आंबेडकरवादी पक्षाच्या एकीकरणाला जो आंबेडकरी नेता विरोध करेल किंवा बैठकीला उपस्थित राहणार नाही. त्या नेत्याच्या निवासस्थाना समोर एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा च्या नेतृत्वात आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल.

असा इशारा एकिकृत रिपब्लिकन समितीचे चंद्रशेखर टेंभूर्ने यांनी पत्रपरिषदेत दिला. पुढे बोलताना ते म्हणाले की,

राज्यात आंबेडकरवादी अनेक संघटना आहेत. ज्या लोकसभा, विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपापले उमेदवार उभे करीत असतात. मात्र आंबेडकरी मतांची विभागणी होत असल्याने एकही गट आपल्या उमेदवारांची अमानत रक्कम सुध्दा वाचवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. राखीव जागेवर सुध्दा तिच परिस्थिती आहे.

कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप सेना किंवा इतर पक्षाकडून राखीव जागेतून निवडून येणारे प्रतिनीधी हे आंबेडकरी समाजाचे प्रतिनीधीत्व न करता ते ज्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आले त्याच पक्षाची हुजरेगिरी करण्यात मग्न असतात. म्हणुन आंबेडकर समाजाचे प्रश्न जसेच्या तसे पडून आहेत. आंबेडकरी समाजाला दिल्या जाणाऱ्या योजनेवरील निधी दिवसेदिवस कमी केल्या जाते. नोकऱ्यातील आरक्षण खाजगीकरणाच्या नावाने संपविण्यात आला. नुकतेच सुप्रीम कोर्टाने आरक्षणात वर्गीकरण करून पुन्हा एस.सी./एस.टी. चे आरक्षण धोक्यात आणले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात नाही, आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. अशा अनेक समस्या असून सुध्दा लोकसभेत किंवा विधानसभेत राखीव जागेवर निवडून येणारे प्रतिनीधी एक शब्द बोलत नाही.

आंबेडकरी समाजाच्या किंवा इतर मागास समाजाच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी खऱ्या आंबेडकरवादी पक्षाचा प्रतिनीधी संसदेत किंवा विधान सभेत जाणे गरजेचे आहे. त्या शिवाय एस.सी, एस.टी, तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या समस्या सुटू शकणार नाही आणि म्हणुनच राज्यात आंबेडकरवादी सर्व गटांना एकत्रीत करून राज्यात एक शास्वत आंबेडकरवादी पक्ष स्थापन करण्यासंबंधी आंबेडकरवादी गटांच्या सर्वच राज्य अध्यक्षांची संयुक्त बैठक दि. १४/०७/२०२४ रोजी नागपूर रविभवन येथे पार पडली व राज्यातील सर्वच आंबेडकरवादी पक्षाची संयुक्त आघाडी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. तसेच एकत्रीकरण करण्यासंबंधी आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबई येथे घेऊन पुढील रणनिती ठरविण्याचे सुध्दा एकमताने ठरविण्यात आले.

बैठकीत ठरल्यानुसार आंबेडकर वादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य अध्यक्ष यांची संयुक्त बैठक मुंबई येथे दि. १७/०८/२०२४ रोजी पदमशाली हॉल नायगाव येथे आयोजीत केली असून सदर बैठकीला सर्वच राष्ट्रीय अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण पाठविले असून सर्वांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.

पत्रपरिषदेत अमृत बन्सोड मुख्य संयोजक, रोशन जांभुळकर निमंत्रक, प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, अमीत बागडे, गजभिए, ग्यानचंद जांभुलकर, दिलीप वानखेडे, व्ही. एम. महामे, विजय भोवते, संजीव भांबोरे, कालीदास खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.


 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे