१२ फुटी महाकाय अजगराने कुत्र्याला अख्खे गिळले
शहरातील अंजनसिंगी रोड वरील जे.बी. पार्क येथील घटना
भटक्या कुत्र्याला १२ फुटी महाकाय अजगरानी गिळले
शहरातील अंजनसिंगी रोड वरील जे.बी. पार्क येथील घटना
धामणगाव रेल्वे/E T News
शहरातील अंजनसिंगी रोडवरील जेबी पार्क येथील रहिवासी भागात एका घरामागे सुमारे 12 ते 13 फूटी लांब व अंदाजे 25 किलो वजनाचा अजगर बेशुद्धावस्थेत एका घरा मागे नागरिकांना दिसुन आला. लोकांनी तातडीने सर्पमित्रांना माहिती दिली. ते माहिती मिळताच सर्पमित्र किरण शेंडे व बाबू शेंडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले.तसेच विलंब लीफे इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया चे प्रोजेक्ट एसोसिएट अंकांन होल्डर यानी हॅलो फोरेस्ट वर या घटनेची सुचना दिल्यावर या माहितीच्या आधारावर लगेज चांदुर रेल्वे वन विभाग कार्यालयाच्या वतीने सर्पमित्र अशफाक शहा घटनास्थळी पोहोचले या सर्प मित्राच्या मदतीने त्या अजगराला जीवदान मिळाले. त्यावेळी सर्पमित्रांनी सांगितले की, या अजगराने एका मोठ्या कुत्र्याला अर्धे गिळले होते. मात्र कुत्रा घ्या अजगराच्या जबड्यात अडकल्याने हा अजगर अडचणीत आला होता. मात्र कुत्रा आकाराने मोठा असल्याने अजगराला ते पूर्ण गिळता आले नाही. आणि कुत्रा अजगराच्या जबड्यात अडकला होता. अजगराने एक दिवसापूर्वी कुत्र्याची शिकार केली होती, त्यामुळे अजगराच्या जबड्यात कुत्र्याचे शरीर फुगले होते. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी आल्या मात्र अश्फाक शाह व इतर सर्पमित्र आपल्या कलेचा वापर
करून त्या कुत्र्याला अजगराच्या जबड्यातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे अजगराला मोठा दिलासा मिळाला असून नवजीवनही मिळाले आहे. यावेळी वनविभागाचे वनरक्षक शिव राठोड,अंकुश खेकडे घटनास्थळी पोहोचले. सर्पमित्र अशफाक शहा, किरण शेंडे आणि बाबू शेंडे यांनी तो अजगर पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला. वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल किशोर धोत्रे आदींनी अजगराला सुखरूप जंगलात सोडले. नंतर कुत्र्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्पमित्र अशफाक शाह यांनी सांगितले की, भारतीय अजगराच्या प्रजातीला इंडियन रॉक पायथन म्हणतात आता हे
नागरी वस्त्यांमध्ये हा साप दिसू लागला आहे. हरीण, कुत्रा आणि इतर लहान प्राणी हे अजगराचे आवडते खाद्य मानले जाते. मात्र हा अजगर विषारी नसून एखाद्याला चावल्यास त्याची हाडे तुटू शकतात, ज्यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो.